Minister Abdul Sattar
Minister Abdul Sattar 
छत्रपती संभाजीनगर

कृष्णा पाटील डोणगावकर गद्दार आहेत, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांची संतप्त प्रतिक्रिया

प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवडणूक घ्यावी लागली. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कृष्णा पाटील डोणगावकर गद्दार आहेत. त्यांनी आजच्या निवडणुकीत हे सिद्ध करून दाखवले, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सोमवारी (ता.पाच) दिली. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी बिनविरोध काढण्यात आली, तर उपाध्यक्षपदासाठी कृष्णा पाटील डोणगावकर यांनी अर्ज दाखल केला.

त्यांची समजूत काढून ही त्यांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. यामध्ये सिल्लोडचे अर्जुन गाढे यांना तेरा मते मिळाली, तर कृष्णा पाटील डोणगावकर यांना केवळ सात मते मिळाली. श्री.सत्तार यांना अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करायची होती. मात्र डोणगावकर यांनी अर्ज दाखल करत निवडणूक घेण्यास भाग पाडले. यामुळे संतप्त झालेल्या सत्तार यांनी निवडणुकीनंतर प्रतिक्रिया दिली. आमचे काही लोक गद्दार निघाले आहेत आणि त्यांना या गद्दारीचे फळ भोगावेच लागणार असल्याची प्रतिक्रिया श्री.सत्तार यांनी दिली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT