minor girl missing case of kidnapping was registered after complaint of parents chhatrapati sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : घरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

कुटुंबीय झोपी गेल्यानंतर अल्पवयीन मुलगी घरातून पहाटे बेपत्ता...

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : कुटुंबीय झोपी गेल्यानंतर अल्पवयीन मुलगी घरातून पहाटे बेपत्ता झाली. हा प्रकार १ जून रोजी पहाटे तीन वाजेदरम्यान बाळापूर फाटा परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून मुकूंदवाडी ठाण्यात मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार परी शंकर बलवाणी (१७, रा. बाळापूर फाटा) असे त्या बेपत्ता मुलीचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानीशंकर बलवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एक जून रोजी बेपत्ता परी हिने कुटुंबीयांसोबत टीव्ही पाहिली, सर्वजण झोपल्यानंतर फिर्यादीची मोठी मुलगी पाणी पिण्यासाठी उठली असता, तिला परी दिसली नाही.

तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे करत आहेत. यासंदर्भात सदर मुलीच्या नावासह छायाचित्र प्रसिद्ध करण्यास पालकांनी संमती दिल्याचे तपास अधिकारी श्री. बचाटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT