mission begain agion.jpg 
छत्रपती संभाजीनगर

Mission Begain Again : औरंगाबादेत काय सुरु काय राहणार बंद...वाचा सविस्तर

शेखलाल शेख

औरंगाबाद : मिशन बिगीन अनेगअंतर्गत नागरीकांना अनेक बाबतीत दिलासा देण्यात आला आहे. मात्र नियम, अटीसह निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत आपले आदेश जारी केले तर औरंगाबाद महापालिका हद्दीत महापालिका आयुक्तांचे आदेश लागू राहणार आहे. 

चित्रपटगृहे, नाटयगृहे, फुडकोर्ट, रेस्टॉरंट बंद राहणार 

१ ऑगस्टपासून महापालिका क्षेत्र वगळून जिल्ह्यातील इतर भागातील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहतील. चित्रपटगृहे, नाटयगृहे, फुडकोर्ट, रेस्टॉरंट बंद राहतील. पण फुडकोर्ट आणि रेस्टॉरंटद्वारे घरपोच सेवा सुरु राहील. रात्रीचा कर्प्यु १ ऑगस्टपासून उठवण्यात आला असून ५ ऑगस्टपासून मॉल तसेच व्यापारी संकुलातील दुकाने सुरु होणार आहेत. मात्र चित्रपटगृह, नाट्यगृह आणि हॉटेल्स, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालय, कोचींग क्लासेस, शैक्षणीक संस्था बंद राहतील. १ ऑगस्ट हा ड्राय डे असणार आहे. तर २ ऑगस्ट पासून सर्व दारु दुकाने सुरु राहणार आहेत. 

सार्वजनिक ठिकाणासाठी अशी आहेत राष्‍ट्रीय मार्गदर्शक तत्‍वे 

  • सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्‍या ठिकाणी व प्रवास करतांना फेस मास्‍क वापरणे बंधनकारक.
  • सार्वजनिक ठिकाणी दोन व्‍यक्‍तीमधील अंतर किमान ६ फुट ठेवावे. दुकानामध्‍ये ग्राहकाची संख्‍या एकावेळी ५ पेक्षा जास्‍त असणार नाही व योग्‍य त्‍या सामाजिक अंतराचे पालन केले जाईल याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत दुकानदार-आस्‍थापना चालक यांच्यावर.
  • मोठया प्रमाणावर गर्दी होणारे ठिकाणे जसे की, संमेलने-परिषदा इ. प्रतिबंधीत असतील. विवाहा सारख्‍या सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेवून ५० पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना उपस्थित राहण्‍यास परवानगी नसेल तसेच अंत्‍यविधीसाठी २० पेक्षा अधिक व्‍यक्‍तींना परवानगी असणार नाही.  
  • सार्वजनिक ठिकाणी व कामाच्‍या ठिकाणी थुंकणे दंडनीय राहील व त्‍यासाठी संबंधीत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या कायद्यानुसार दंड आकारण्‍यात यावा. 
  •  सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा, मद्य, धुम्रपान यांचे सेवन करण्‍यास मनाई राहील. 

महापालिका वगळता जिल्ह्यात अशी राहिल स्थिती 

  • जिल्‍हयाअंतर्गत बस सेवा जास्‍तीत जास्‍त ५० टक्‍के कार्यक्षमतेनुसार, सामाजिक अंतर व सॅनिटाईझरच्‍या वापरासह चालु राहतील. 
  • एका जिल्‍हयातून दुसऱ्या जिल्‍हयात जाण्‍यासाठी पूर्वीप्रमाणे निर्बंध लागू राहतील. 
  • अत्‍यावश्‍यक बाबी-सेवा न देणारी बाजारपेठ, दुकाने सकाळी ९.०० ते सायं. ७.०० वाजेपर्यत चालू राहतील. 
  • मॉल आणि व्‍यापारी संकुले नाट्यगृहे-प्रेक्षागृहे व फुड कोर्ट- उपहारगृहे वगळून ता. ५ ऑगस्‍ट २०२० पासून सकाळी ९.०० ते सायं. ७.०० वाजेपर्यत चालू राहतील. तसेच मॉल मधील उपहारगृहातील स्‍वयंपाकगृह घरपोच सेवा देण्‍यासाठी चालु ठेवता येईल. याबाबत संबंधीत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेने लागू केलेले नियम- अटी लागू राहतील राहणार आहे. 
  • लग्‍न समारंभासाठी खुली जागा, लॉन, वातानुकुलीत नसलेले हॉल शासन आदेश ता. २३ जूनच्या निर्बधासह चालू राहतील. 
  • मोकळया मैदानातील व्‍यायाम/शारिरीक क्रिया निर्बंधासह चालू राहील. 
  • वृत्‍तपत्राची छपाई व वितरण (घरपोच सेवेसह) चालु राहील. 
  • शैक्षणीक संस्‍थांची कार्यालये,कर्मचारी (विद्यापिठे-महाविद्यालये-शाळा ) शिकविण्‍या व्‍यतिरिक्‍त अशैक्षणिक कामकाज जसे की, ई साहित्‍याचा विकास, उत्‍तर पत्रिकाचे मुल्‍यांकन, निकालाची घोषणा यासाठी चालू राहील. 
  • केशकर्तनालय ब्‍युटी पार्लर, सलुन, स्‍पा दुकाने या कार्यालयाचे आदेश २६ जून मधील नमूद केलेल्‍या निर्बंधासह चालु राहतील.

Edited By Pratap Awachar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT