छत्रपती संभाजीनगर

पत्नी प्रेमापोटी मूकबधिर

CD
पत्नी येईना नादायला; पतीचा मनोऱ्यावर ठिय्या! --- व्हिडिओ काॅलनंतर खाली उतरला ----- लोहा, ता. ७ (बातमीदार) : कोणत्या कारणास्तव कोण काय करील, याचा नेम राहिला नाही. मुखेड तालुक्यातील एका चाळीस वर्षीय मूकबधिर तरुणाने चक्क मोबाइलच्या टॉवरवर चढून स्वतःच्या पत्नीसोबत असलेले बॅनर झळकवत चार तास ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले. त्याला कारणही तसेच होते. पत्नीला सासरची मंडळी नांदण्यास पाठवीत नसल्याने त्याने अशी शक्कल लढवली. चार तासानंतर पत्नीने व्हिडिओ कॉल केल्यानंतर तो खाली उतरला. ही घटना लोहा बसस्थानक परिसरात सोमवारी (ता. सात) सकाळी सातला घडली. लोहा शहरातील हळदव परिसरातील अफिया गफार घोडके हिचा मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील शादुल मकदुम दौलताबादी याच्याशी एप्रिल २०२४ मध्ये रीतिरिवाजानुसार विवाह झाला. विशेष म्हणजे दोघेही पती-पत्नी मूकबधिर आहेत. हे दांपत्य तेलंगण राज्यात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. दरम्यान, पत्नी माहेरी आल्यानंतर सासरकडील मंडळी तिला नांदण्यास पाठवत नाही, असा आरोप शादुल याचा आहे. यापूर्वी त्याने मागील आठ महिन्यांपूर्वी असेच आंदोलन केले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास लोहा बसस्थानकाच्या मागील भागात असलेल्या मोबाइल टॉवरवर चढून पत्नीचे बॅनर टॉवरवर झळकवत चार तास ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले. ही माहिती पोलिसांनी शादुलच्या सासरकडील मंडळींना दिली. तसेच त्याच्या पत्नीशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे करून दिले. अखेर दिलजमाई झाल्यानंतर शादुल चार तासाने, दहाला टॉवरवरून खाली उतरला आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत आई-वडिलांकडे सोपविले. याप्रकरणी उशिरापर्यंत दौलताबादी आणि घोडके कुटुंबात चर्चा सुरू होती. यावेळी लोहा बसस्थानक परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. ----- लोहा : मोबाइल टॉवरवर पती-पत्नीचे बॅनर झळकविताना तरुण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT