छत्रपती संभाजीनगर

ऊस तोडणीतून एकरी ४०० वाढ्याच्या पेंढ्या दुष्काळाच्या संकटात चार्याची सोय;

CD
ऊसतोडणीतून एकरी ४०० वाढ्याच्या पेंढ्या ------ दुष्काळाच्या संकटात हार्वेस्टरवरील ‘टॉपर’ यंत्रामुळे चाऱ्याची सोय सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ५ : दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची तीव्र टंचाई असताना रेणा साखर कारखान्याच्या वतीने मुशिराबाद येथील शेतकऱ्यांच्या शेतात राबविण्यात आलेल्या आधुनिक यंत्रणेमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे. हार्वेस्टरद्वारे होत असलेल्या ऊसतोडणीत ‘टॉपर’ यंत्राच्या साहाय्याने उसाचे वाढे वाया न जाता सुरक्षितपणे बाजूला निघत असून, यामुळे एका एकरामध्ये तब्बल ४०० वाढ्याच्या पेंढ्या मिळत आहेत. या दिलासादायक उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख आणि माजी आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रेणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ही आधुनिक हार्वेस्टर यंत्रणा राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची प्रत्यक्ष पाहणी कारखाना पदाधिकाऱ्यांच्या वतीने नुकतीच मुशिराबाद येथील शेतकरी निवृत्ती आरदवाड यांच्या शेतात केली. कारखान्याचे व्हाइस चेअरमन ॲड. प्रवीण पाटील म्हणाले, पारंपरिक पद्धतीने ऊस तोडणी करताना चारा अनेकदा नष्ट होतो किंवा मातीत मिसळतो; परंतु, हार्वेस्टरवरील ‘टॉपर’ यंत्रामुळे उसाचे वाढे उत्तम दर्जाचे आणि व्यवस्थित बाजूला निघतात. यामुळे शेतकऱ्यांना जनावरांसाठी पुढील ३ ते ४ महिन्यांच्या चाऱ्याची भक्कम सोय उपलब्ध झाली आहे. सध्याच्या दुष्काळयुक्त परिस्थितीत चाऱ्याची उपलब्धता होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. यावेळी संचालक शंकर पाटील, रणजित पाटील, तज्ज्ञ संचालक नरसिंग इंगळे यांच्यासह शेतकरी जीवन मलवाडे, रामेश्वर मलवाडे, परमेश्वर बेडदे, गिरीश मलवाडे, विश्वनाथ कोरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital Payments: ऐन दिवाळीत Google Pay डाऊन? ऑनलाइन पेमेंट करताना अनेकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : घाबरायचे नसते, त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचा असतो - गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

SCROLL FOR NEXT