सीवूडसमध्ये डास वाढले  
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाच्या‘आरटीपीसीआर’च्या टेस्ट ट्यूबमध्ये आढळला डास!

मनोज साखरे

सेवकाने चुकीने आल्याचे सांगत तातडीने त्यांना दुसरी बाटली दिली. यावर श्री. गोयल यांनी सांगितले की, चाचणीसाठीच्या द्रवात नाकातील व लाळेतील द्रव जतन करण्यासाठी ठेवण्यात येतात. परंतू डास आढळणे हे धोक्याचे आहे.

औरंगाबाद : कोविडच्या Corona Test निदानासाठी ‘आरटीपीसीआर’ RTPCR चाचणीसाठी गेलेल्या नागरिकाला दिलेल्या नमुना टाकण्यासाठीच्या बाटलीत (टेस्ट ट्युब) द्रवात डास आढळला. अशा प्रकारामुळे चाचणीचे वेगळे परिणाम अथवा दोष येण्याची शक्यता नागरिकाने व्यक्त केली. हा प्रकार महापालिका Aurangabad Municipal Corporation कम्युनिटी हॉल, सिडको एन-दोन येथील चाचणी केंद्रावर गुरूवारी (ता. १७) घडला. शहरातील सिडको एन-तीन येथील अभ्यासिका चालवणारे अक्षय गोयल हे कम्युनिटी हॉल, सिडको एन-दोन येथे कोविड Corona चाचणीसाठी गेले. तेथे त्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करायची असल्याने त्यांना नमुना जतन करण्यासाठीची बाटली (टेस्ट ट्यूब) आरोग्य सेवकाने दिली व थांबण्यास सांगितले. या बाटलीतील पिवळ्या द्रवात त्यांना डास दिसून आला. हे पाहून श्री. गोयल यांनी हा प्रकार चाचणी केंद्रावरील आरोग्य सेवकाला सांगितला. सेवकाने चुकीने आल्याचे सांगत तातडीने त्यांना दुसरी बाटली दिली. यावर श्री. गोयल यांनी सांगितले की, चाचणीसाठीच्या द्रवात नाकातील व लाळेतील द्रव जतन करण्यासाठी ठेवण्यात येतात. Mosquito Found In Corona's RTPCR Test In Aurangabad

परंतू डास आढळणे हे धोक्याचे आहे. तिच बाटली नागरिकांना दिली जात असेल तर संभाव्य चाचणीत दोष आढळू शकतात. ‘माझ्यासोबत हा प्रकार घडला. मी वेळीच लक्ष दिले म्हणून ठिक आहे. परंतू इतरांसोबत असे प्रकार घडू नयेत,’ अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Viral News: मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही सुट्टी नाकारली! अखेर लोको पायलटने अधिकाऱ्यासमोरच काढली पँट; रेल्वेतील धक्कादायक प्रकार

Arjun Tendulkar Marriage: अर्जुन-सानियाचं लग्न! तेंडुलकर कुटुंब सजलं, मेहंदी-संगीत सोहळ्यासाठी सेलिब्रेटिंचीही हजेरी; Video Viral

SCROLL FOR NEXT