किट्टी आडगाव (ता. माजलगाव) : विद्युतप्रवाह उतरल्याने घराला आग लागली होती. 
छत्रपती संभाजीनगर

विद्युतप्रवाह पत्र्यात उतरल्याने मायलेकीचा मृत्यू

पांडुरंग उगले

घरातील वायरिंगचे वायर कट होऊन विद्युतप्रवाह घराच्या संपूर्ण पत्रात उतरलेला होता; परंतु याची कल्पना घरातील कोणालाच नव्हती.

माजलगाव (जि.बीड) : विद्युत प्रवाह (Electricity) उतरलेल्या घराच्या पत्राला चिटकून मायलेकीचा मृत्यू झाला. ही दुर्घटना घटना किट्टी आडगाव (ता. माजलगाव) (Majalgaon) येथे रविवारी (ता.२३) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. शशिकला शंकरराव फपाळ (वय ६५), सखुबाई शंकरराव फपाळ (वय ४५) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मायलेकीची नावे आहेत. तालुक्यातील (Beed) किट्टी आडगाव येथे फपाळ कुटुंब एका पत्राच्या शेडमध्ये (घरात) राहते. घरातील वायरिंगचे वायर कट होऊन विद्युतप्रवाह घराच्या संपूर्ण पत्रात उतरलेला होता; परंतु याची कल्पना घरातील कोणालाच नव्हती. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शशिकला फपाळ या बाहेरून दूध घेऊन घरात आल्या. (Mother And Her Daughter No More Due To Electric Short Circuit In Majalgaon Taluka)

यावेळी त्यांचा स्पर्श घराच्या पत्राला झाल्याने त्या चिटकल्या. हे त्यांची मुलगी सखुबाई फपाळ यांनी पाहताच आईला वाचवण्यासाठी जवळ गेल्याने त्याही चिटकल्या. दोन्ही मायलेकीच्या अंगात विद्युतप्रवाह उतरलेला असताना अचानक संपूर्ण घरालाच आग लागली. ग्रामस्थ त्यांना वाचवण्यासाठी धावले. परंतु तोपर्यंत आगीने घराला वेढले. या दुर्घटनेत वरील दोन्ही मायलेकीचा जागीच कोळसा होऊन मृत्यू झाला. या घटनेची माहिती होताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT