करमाड (जि.औरंगाबाद) : चारचाकीने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील वृद्ध महिला ठार, तर दुचाकी चालक व दोन बालके गंभीर जखमी झाले आहेत.  
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत भीषण अपघात; आई ठार, दोन बालकांसह मुलगा गंभीर जखमी

संतोष शेळके

करमाड (जि.औरंगाबाद) : चारचाकीने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील वृद्ध महिला ठार, तर दुचाकी चालक व दोन बालके गंभीर जखमी झाले आहेत. शेंद्रा एमआयडीसी (Shendra MIDC) मुख्य रस्त्यावरील हर्मन कंपनीसमोर रविवारी (ता.19) रात्री आठ वाजता हा गंभीर अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की चारचाकी वाहनाने दुचाकीला (Accident In Aurangabad) धडक दिल्यानंतर दुचाकी सुमारे 60 फूट उंच उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेत कचराबाई जाधव (वय 60) यांचे उपचारापूर्वीच निधन झाले. तर अनिल जाधव (35), छकुली अनिल जाधव (12), तर बंटी अनिल जाधव (10, सर्व रा. नाथनगर, वडखा, ता.औरंगाबाद) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल जाधव हे आपल्या दुचाकीवरून (एमएच 20 डीडब्लू 3054) जालना महामार्गाकडे आई व मुलांसह जात होते. यावेळी हर्मन चौकात भरधाव चारचाकी वाहनाने (एमएच 20 एफपी 6878) दुचाकीस जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की चारचाकीची एअरबॅग उघडली गेली व दुचाकी सुमारे 60 फुट उंचीवर जाऊन पुन्हा दुभाजकावर आदळली. यात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. घटनेनंतर चारचाकी चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. रात्रीची वेळ असल्याने या ठिकाणी रहदारी कमी होती. काही प्रत्यक्षदर्शींनी थेट जखमींना रुग्णालयात पोहोचवले. दरम्यान, उपचारापुर्वीच कचराबाई यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. तर अनिल जाधव यांचे दोन्ही पाय निकामी झाले असुन दोन्ही मुलं गंभीर असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT