छत्रपती संभाजीनगर

कोरोनातून बऱ्या झालेल्या सुनेला सासऱ्याने दिले किडनीदान

कुटुंबप्रमुख म्हणून खऱ्या अर्थाने लौकिकपात्र ठरत कोविड-१९ मधून बऱ्या झालेल्या सुनेला सासऱ्याने किडनीदान देऊन जीवनदान दिले.

सकाळ वृत्तसेवा

कुटुंबप्रमुख म्हणून खऱ्या अर्थाने लौकिकपात्र ठरत कोविड-१९ मधून बऱ्या झालेल्या सुनेला सासऱ्याने किडनीदान देऊन जीवनदान दिले.

औरंगाबाद - कुटुंबप्रमुख म्हणून खऱ्या अर्थाने लौकिकपात्र ठरत कोविड-१९ (Covid-19) मधून बऱ्या झालेल्या सुनेला सासऱ्याने किडनीदान (Kidney Donate) देऊन जीवनदान (Life Saving) दिले. विशेष म्हणजे दोघांचेही रक्तगट भिन्न होते. ‘एबी’ व ओ असे विसंगत मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया औरंगाबादेतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये नुकतीच झाली, अशी माहिती हॉस्पिटलच्या केंद्रप्रमुख डॉ. नेहा जैन यांनी शनिवारी (ता. १२) दिली.

जालना जिल्ह्यातील २५ वर्षीय महिलेची किडनी सहा महिन्यांपूर्वी निकामी झाली. तिच्या शरीरातून मूत्र विसर्जन होत नसल्याने, सर्व शरीरावर सूज येणे आणि खोकला आल्यानंतर थुंकीतून रक्त येणे अशा समस्या उद्भवत होत्या. तिला ‘इंटेन्सिव्ह युनिट’मध्ये डायलिसीस उपचार करण्याची आवश्यकता होती. तिच्या या स्थितीमध्ये तिची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया महत्त्वाची होती. परंतु किडनीदात्याच्या अनुपलब्धतेमुळे ही शस्त्रक्रिया स्थगित करण्यात आली. या कठीण परिस्थितीत महिलेच्या सासऱ्यांनी सुनेला किडनीदान करण्याचा धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला. आव्हाने कमी नव्हती. त्यांचे रक्त गट (बी पॉझिटिव्ह) व रुग्णाचा रक्तगट (ओ पॉझिटिव्ह) असे भिन्न होते. कोणत्याही अन्य दात्याच्या अनुपस्थितीत, मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांच्या टीमने ‘एबी’, ‘ओ’ विसंगत किडनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय डिसेंबर २०२१ ला घेतला.

डॉ. सचिन सोनी, डॉ. अभय महाजन, डॉ. अरुण चिंचोले, डॉ. सुनील पालवे, डॉ. राहुल रुईकर, डॉ. दिनेश लाहिरे, डॉ. सुनील मुर्के, आणि डॉ. अभिजित काबडे यांनी ही शस्त्रक्रिया केली. प्रत्यारोपण समन्वयक संदीप चव्हाण यांनी कायदेशीर औपचारिकता सुलभ केली.

कोविडचे आव्हान

शस्त्रक्रिया ठरली पण रुग्णाला कोविड संसर्ग झाला. त्यामुळे २ फेब्रुवारीला नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सचिन सोनी यांनी शस्त्रक्रिया केली. सासरे व सून दोघांचेही किडनी कार्य सामान्य असून ते तंदुरुस्त आहेत. ‘एबी’, ‘ओ’ विसंगत किडनी प्रत्यारोपण हे मराठवाड्यातील पहिलीच शस्त्रक्रिया असून अवयवदानाची गरजही केंद्रप्रमुख डॉ. नेहा जैन यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT