MPSC Prelims exam arrangement  Sakal
छत्रपती संभाजीनगर

MPSC Preliminary Exam : एमपीएससीची २१ जुलैला पूर्वपरीक्षा; शहरात ४६ केंद्रांवर १४ हजार ७८४ उमेदवारांची व्यवस्था

MPSC Prelims exam arrangement : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (ता. २१) सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या अशा दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (ता. २१) सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या अशा दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी जिल्ह्यात ४६ केंद्रांवर एकूण १४ हजार ७८४ उमेदवारांच्या परीक्षेची सोय करण्यात आली आहे. यासाठी तब्बल १५७२ अधिकारी- कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली.

परीक्षार्थींसाठी सूचना

  • परीक्षेस येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

  • परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेश प्रमाणपत्र काळ्या व निळ्या शाईचे बॉल पाँईट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही.

  • उमेदवारास त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटूथ, कॅमेरा किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.

  • सुधारीत कार्यपद्धतीनुसार प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेच्या अर्धा तास पूर्वीपर्यंत (सकाळी ९.३० पर्यंतच) उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देणे आवश्यक आहे.

  • परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi on Indus Water Treaty : 'सिंधू जल करार'वरून नेहरूंचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र, म्हणाले...

सुदर्शन विरुद्ध राधाकृष्णन! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचा उमेदवार जाहीर, कोण आहेत बी सुदर्शन रेड्डी?

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : ठाण्यातील संतोष पाटील नगर येथील घरावर दरड कोसळली

शाब्बासssss : Prithvi Shaw चे खणखणीत शतक अन् सावरला महाराष्ट्राचा डाव; ऋतुराज गायकवाड 'सरळ' चेंडूंवर बोल्ड, Video

Godavari River : गोदावरी पाणीवाटपाचा वाद मिटणार? प्राधिकरणाने मराठीत अहवाल प्रसिद्ध केला

SCROLL FOR NEXT