छत्रपती संभाजीनगर

जुनी पेन्शनसाठी २८ सप्टेंबरपासून धरणे

CD
जुनी पेन्शनसाठी सोमवारपासून मुंबईत धरणे --- छत्रपती संभाजीनगर, ता. २२ : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघ आक्रमक झाला आहे. २५ सप्टेंबरपर्यंत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास २८ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर राज्यातील २६ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेने मंगळवारी (ता. २२) दिली. या आंदोलनात जिल्ह्यातून सुमारे ७०० कर्मचारी सहभागी होणार आहेत. धर्मवीर संभाजीराजे विद्यालयात जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियोजन बैठक झाली. बैठकीत मुंबई आंदोलनासाठी तालुकानिहाय व विभागनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक शाळेतील पात्र कर्मचाऱ्यांपर्यंत आंदोलनाचा संदेश पोचविण्यासह मुंबईला जाण्यासाठी प्रवास व उपस्थितीचे नियोजन करण्यात आले. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत रुजू होऊन नंतर टप्प्याटप्प्याने १०० टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी संघटनेची मागणी आहे. या प्रश्नावर न्यायालयीन लढा व शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे निवेदन दिले आहे. ---- एकत्र येण्याचे आवाहन सर्व संघटना, गट-तट बाजूला ठेवून पेन्शनच्या मागणीसाठी एकत्र येण्याचे आवाहन गणेश पवार, शक्तिसिंग छानवाल, काकासाहेब जाधव, सुरेश पठाडे, दिलीप कुंदे, अनिल घायवट, विजय फरकाडे, भाई चव्हाण, शिवकुमार वाणी, अतुल घडामोडे, मनोज चव्हाण व संदीप बोराडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Lung Health: तुमचं वय वाढतंय अन् फुफ्फुसे वेगाने थकतात! वयानुसार 'लंग हेल्थ' कडे दुर्लक्ष नका करू; वाचा काय सांगतात तज्ज्ञ...

SCROLL FOR NEXT