संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा आहे.
औरंगाबाद : कोरोना (Corona) संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदी नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र शहरात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणा (Administrative system) कामाला लागली आहे. सुरुवातीला महापालिका प्रशासकांनी शहरात पाहणी करून दंडात्मक कारवाई (Punitive action) करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शुक्रवारी (ता. २१) जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांनी पाहणी करून कारवाया केल्या. त्यानंतर महापालिका प्रशासकांनी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईसाठी दहा पथके तयार केली आहेत. त्यात ४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शनिवारपासून (ता.२२) या पथकांनी शहरात कारवाई सुरू केली आहे. ३१ मेपर्यंत संचारबंदी आदेश लागू आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवसात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश या पथकांना देण्यात आले आहेत. (Municipal administrators have formed ten squads to take action against those who do not follow the rules)
संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशा इशारा देण्यात आला आहे. मात्र, शहरात संचारबंदीच्या काळात हजारो नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकाने देखील उघडी ठेवली जात आहेत. अनेक भागांत नागरिक विनामास्क फिरतात. नागरिकांच्या अशा वागण्यामुळे पुन्हा कारोना संसर्ग वाढू शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे. ३१ मेपर्यंत संचारबंदी आदेश आहेत. त्यामुळे शेवटच्या दहा दिवसात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी निर्णय घेतला आहे. त्यासाठी दहा पथके, चाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
एका पथकात चार कर्मचारी
प्रत्येक प्रभागासाठी एका पथक तयार करण्यात आले आहे. त्यात चार कर्मचारी आहेत. नऊ झोनसाठी नऊ पथके असून एक केंद्रीय पथक आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांना शनिवारी सकाळी अकरा वाजता मुख्यालयात बोलावण्यात आले. प्रत्येक पथकासाठी एक गाडी देण्यात आली. पथक प्रमुखाच्या ताब्यात साहित्य आणि गाडी देऊन त्यांना रवाना करण्यात आले.
नियम न पाळणारी दुकाने होणार सील
नियमाचे पालन न करणारे दुकाने सील करा, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा असे आदेश या पथकांना देण्यात आले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर किंवा घोळक्याने उभे राहणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची सूचना पथकाला करण्यात आली आहे. सर्व पथकप्रमुखांनी घनकचरा विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्याकडे रात्री नऊच्या नंतर रोजच्या कारवाईचा अहवाल सादर करावा असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे.
(Municipal administrators have formed ten squads to take action against those who do not follow the rules)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.