छत्रपती संभाजीनगर

महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम

CD
फोटोसह ---------- कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ------------ मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. २ ः महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांसह कर्मचाऱ्यांना कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. १० नोव्हेंबरपर्यंत हे कार्यक्रम सुरू होणार असून, रविवारी (ता. एक) उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याने कार्यक्रमांची सुरवात झाली. बी. रघुनाथ सभागृहात रविवारी (ता.एक) वर्धापन दिनानिमित्त महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी महापौर सय्यद इकबाल, आयुक्त नितीन नार्वेकर, उपायुक्त तुकाराम कदम, शेजुळ, जुबेर हाश्मी, गजानन जाधव, राजकुमार जाधव, के. के. भारसाकळे, इफ्तियार खान पठाण आदींची उपस्थिती होती. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध विभागातील प्रशांत कुलकर्णी, कैलास काकडे, पुंडगे, शिवगंगा सीताराम खोरगे, दीपक कानोडे, शेख सरवर, आशा गायकवाड, राजेभाऊ मोरे, खाजा मोईन खान, मंगल धस, संगीता उबाळे, अतीया कौसर समीउल्लाह खान, अब्दुल सैफ, सागर भराडे, लीलाबाई वॉस्टर, वीर डोके, अंबादास शिंदे, प्रकाश काकडे, दीपक भांगे, मीनाबाई भराडे, राधा पतंगे, राजू काळे, केशव पैके, ज्योती मोरे, सुनीता जमादार, सय्यद सादेक, तुकाराम काळे, गजानन यादव, नंदाबाई बोरकर, ईखत्यारखान पठाण, शेख मोहम्मद, नागसेन कांबळे, अर्जुन झटे आदींचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त वसुली लिपिक अंबादास शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत पी. एम. स्वनिधी आत्मनिर्भर योजनेतील लाभार्थी सुनीता त्रिंबक डासाळकर यांनी १० हजाराच्या कर्जापासून दहा लाखांपर्यंतचा व्यवसाय वाढवल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना सहकार्य करणारे नवाब भाई, कलीम अंसारी, रहमानभाई व पारदेश्वर विद्यालयाच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ---------- विविध स्पर्धांसह दिवाळी पहाट वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंगळवारी (ता.तीन) महिलांसाठी होममिनीस्टर स्पर्धा, मनपातील अधिकारी, कर्मचाऱ्यासाठी गीतगायन स्पर्धा, जिल्हा क्रीडा संकुलात पत्रकार व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा क्रिकेट सामना होणार आहे. या व्यतिरिक्त दिवाळी पहाट या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST NCMC Card: कार्डधारकांना फटका! एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड

'येतेच आता मी नांदायला'साठी झी मराठीची ही मालिका घेणार निरोप? यंदा एकही पुरस्कार नाही, शेवटचा भाग कधी?

Latest Marathi News Live Update : पुणे, अहिल्यानगरनंतर धुळे जिल्हा सत्र न्यायालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Supreme Court: यंदाच्या दिवळीत फक्त ग्रीन फटाके फोडण्यासच सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; वेळेची मर्यादाही केली निश्चित

GST Collection : जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल! ऑक्टोबरमध्ये विक्रमी २३ टक्क्यांची वाढ

SCROLL FOR NEXT