sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : शहराच्या उद्यानांतील गेम झोनचे होणार खासगीकरण

‘आम्हाला खेळू द्या’ अभियानाची महापालिकेतर्फे तयारी सुरू असताना आता उद्यानांतील ‘गेम झोन’चे खासगीकरण करण्यासाठी महापालिकेने इच्छुकांकडून प्रस्ताव मागविले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात एकीकडे ‘आम्हाला खेळू द्या’ अभियानाची महापालिकेतर्फे तयारी सुरू असताना आता उद्यानांतील ‘गेम झोन’चे खासगीकरण करण्यासाठी महापालिकेने इच्छुकांकडून प्रस्ताव मागविले आहेत. त्यामुळे उद्यानात मुलांना घसरगुंडी, झोका, सिसॉ खेळण्यासाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

महापालिकेतर्फे शहराच्या विविध भागातील उद्यानांचा विकास केला जात आहे. त्यानुसार सिडको एन-८ येथील बोटॅनिकल गार्डन, नेहरू उद्यान, सिडको एन-१२ येथील स्वामी विवेकानंद उद्यान, रोज गार्डन, डॉ. सलीम अली उद्यान, हर्सूल तलावाच्या पायथ्याशी असलेले स्मृतिवन उद्यान विकसित केले जाणार आहे. सिद्धार्थ उद्यान आणि बोटॅनिकल गार्डनमध्ये मिनी ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणच्या मिनी ट्रेन एजन्सीच्या माध्यमातून चालवली जात आहे.

त्या बदल्यात महापालिकेला व्यवसायाच्या २५ टक्के रॉयल्टी मिळते. त्यातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यानंतर आता उद्यानातील ‘गेम झोन’चे खासगीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी डॉ. सलीम अली उद्यान, सिद्धार्थ उद्यान, स्वामी विवेकानंद उद्यान आणि स्मृतिवन उद्यान हर्सूल या चार उद्यानांची निवड करण्यात आली आहे. या उद्यानांमध्ये ‘गेम झोन’ चालवू इच्छिणाऱ्या एजन्सींनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकीकडे चला खेळूया; दुसरीकडे खेळू नका

पात्र ठरणाऱ्या एजन्सीला पाच वर्षांसाठी ‘गेम झोन’ चालवण्यासाठी दिले जाणार आहेत. प्रस्ताव दाखल करण्याची मुदत १६ जानेवारी २०२४ पर्यंत आहे. महापालिका एकीकडे शहरातील खुल्या जागा, मैदाने विकसित करून मुलांना मैदानाकडे आणण्याचा प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे आता उद्यानातील मुलांचे खेळणे खासगीकरणामुळे महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT