छत्रपती संभाजीनगर

कारभारात हवीय सुधारणा तर करा महापालिकेला सूचना

CD
कारभारात हवी सुधारणा; तर करा महापालिकेला सूचना -- ‘सुधारणा उत्सव’ अभियानात ३१ ऑक्टोबरपर्यंत संधी -- छत्रपती संभाजीनगर, ता. १६ : महापालिकेच्या विविध सेवांसाठी नागरिकांना माराव्या लागणाऱ्या चकरा आणि प्रक्रियेतील विलंबाविषयी तक्रार असेल, तर त्यात आता सुधारणा होऊ शकते. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार ‘सुधारणा उत्सव २०२६’ हे अभियान राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्यक्ष कामकाजात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर आवश्यक असणाऱ्या सुधारणांबाबत महापालिकेने ३१ ऑक्टोबरपर्यंत थेट नागरिकांकडूनच सूचना व शिफारसी मागविल्या आहेत. सामान्य नागरिकांना महापालिकेतून विविध दाखले, परवानग्या किंवा सेवा मिळवताना अनेक प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर नागरिककेंद्रित सुधारणा घडवून आणणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. कामाच्या प्रक्रियेत लागणाऱ्या अनावश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणे, मंजुरीच्या क्लिष्ट पायऱ्या आणि कालबाह्य नियम रद्द करणे, विभागांमधील समन्वय वाढवून जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन व डिजिटल करणे, यासारख्या बाबींवर भर दिला जाणार आहे. नागरिकांना महापालिकेच्या सेवांबाबत वाटणाऱ्या त्रुटी आणि त्यावर सुचवायचे उपाय ३१ ऑक्टोबरपर्यंत contact@chhsambhajinagarmc.org या ई-मेलवर पाठवता येतील. याशिवाय महापालिका मुख्यालयातील समन्वय विभागात प्रत्यक्ष जाऊनही लेखी स्वरूपात सूचना सादर करण्याची सोय करण्यात आली. --- (((कोट))) नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या अडचणी व सुधारणांबाबत आपल्या सूचना नोंदवाव्यात. प्राप्त सूचनांचा शासननिर्णयानुसार गांभीर्याने विचार करून कारभारात सकारात्मक बदल केले जातील. - अमोल येडगे, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: तिरंगा मोर्चापूर्वीच अभिजीत दिपके आणि नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

Delhi News : जंतर-मंतर कुणाचे?

SCROLL FOR NEXT