crime news murder jalna esakal
छत्रपती संभाजीनगर

Jalna : वकील पतीचा पत्नीकडून खून

दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

जालना : शहरातील अर्चनानगर येथील ॲड. किरण लोखंडे (वय २८) यांचा त्यांच्या पत्नीने खून केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, तालुका पोलिसांनी संशयित मनिषा लोखंडे (वय २१) व तिचा साथीदार गणेश मिठू आगलावे (वय २३, ह.मु. जालना) या दोघांना अटक करण्यात आली आहे, या दोघांना बुधवारी (ता.सात) न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शहरातील अर्चनानगर येथे ता. एक सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गॅस गळती होऊन स्फोट झाल्याचे मनिषा लोखंडे हिने पोलिसांना कळविले होते. यात ॲड. किरण लोखंडे यांचा मृतदेह पूर्णतः जळाला होता. मात्र, पोलिसांना येथे पाहणी केल्यानंतर घटनेबाबत संशय आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करत असताना या घटनेच्या दोन दिवसांपूर्वीचे या भागातील सीटीटीव्ही फुटेज मिळविले. या फुटेजमध्ये मनिषा लोखंडे व तिचा साथीदार गणेश आगलावे मध्यरात्रीनंतर ये-जा करताना दिसून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शिवाय चौकशी दरम्यान ते उडवाउडवीचे उत्तरेही देत होते.

प्राथमिक चौकशी केल्यानंतर या दोघांना मंगळवारी (ता.सहा) रात्री तालुका जालना पोलिसांनी अटक केली. या दोघांना बुधवारी (ता.सात) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने या दोघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संभाजी वडते यांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

तीन महिन्यांपूर्वी विवाह

तीन महिन्यांपूर्वी ॲड. किरण लोखंडे यांचे मनिषा सोबत लग्न झाले होते. अशात ता. एक सप्टेंबर रोजी गॅसचा स्फोट होऊन ॲड. लोखंडे यांचा मृतदेह पूर्णतः जळाला. त्यामुळे मुद्मामहून गॅस गळती केली होती काय, नंतर आग कशी लावली, या दोन्ही संशयितांचे एकमेकांच्या संपर्कात किती दिवसांपासून होते, खून करण्याचे कारण काय होते अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिस शोधत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT