sakal
छत्रपती संभाजीनगर

मित्रानेच केला मित्राचा खून, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

औरंगाबाद विद्यापीठातील लेणीजवळ मित्राला बोलावून केले चाकूने वार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मित्राने फोन करुन विद्यापीठातील लेणीजवळ भेटायला बोलावले, अन् त्याच्याशी भांडण करत चक्क चाकूने वार केले. हा गंभीर प्रकार २ ऑक्टोंबरच्या पहाटे दीड ते पावणे दोनच्या सुमारास विद्यापीठातील लेणीजवळ घडला. मयूर भास्कर आडोळे ऊर्फ नन्या (रा. श्रीकृष्ण मंदीराजवळ, बेगमपूरा) असे त्या चाकूने वार करणाऱ्या आरोपी मित्राचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी फिर्यादी सम्राट सुरेश वानखेडे (२४, रा. नंदनवन कॉलनी) आणि मयूर ऊर्फ नन्या हे एकमेकांचे मित्र आहेत. दोन ऑक्टोंबर रोजी नन्याने सम्राटला फोन केला आणि विद्यापीठातील बौध्द लेणीजवळ भेटण्यासाठी बोलवले. दरम्यान सम्राट हा मित्रासोबत गेला असता, नन्या याने ‘तु माझ्याबद्दल पोरांना काय सांगत असतो?’ असे म्हणत सम्राटला हाताचापटाने मारहाण करण्यास सुरु केली.

दरम्यान सम्राट हा समजावून सांगत असतानाच नन्याने कंबरेमध्ये लावलेला धारधार चाकू काढुन सम्राटच्या डाव्या बरगडीमध्ये खुपसला. यात सम्राट गंभीर जखमी होत कोसळला. सम्राटच्या इतर मित्रांनी त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालय (घाटी) येथे उपचारासाटी दाखल केले. सम्राट हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी उपनिरीक्षक ज्योती गात यांनी गुन्हा दाखल केला. नन्या याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने मयूर ऊर्फ नन्याला बुधवारपर्यंत (ता.६) पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शेख करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT