छत्रपती संभाजीनगर

नक्षत्रवाडीत गणेशमित्रांची स्वच्छता मोहीम

CD
(फोटो ः ABD26J79730) (((फोटो ओळ))) नक्षत्रवाडी ः स्वच्छता अभियानात सहभागी झालेले गणेशभक्त. --- नक्षत्रवाडीत गणेशभक्तांची स्वच्छता मोहीम ---- नक्षत्रवाडी, ता. १९ ः गणेशोत्सव केवळ भक्तीचा सोहळा न राहता तो सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा व्हावा, या हेतूने महापालिकेने ‘आमचा बाप्पा ः स्वच्छतेचा राजा’ हा उपक्रम सुरू केला आहे. ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत नक्षत्रवाडी परिसरात या उपक्रमाअंतर्गत गणेशमित्र व महापालिकेतर्फे विशेष स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. त्यात नक्षत्रवाडी येथील गणेश मंडळाचे कार्यकर्ते, समाजसेवक मोहित त्रिवेदी, महापालिकेची ‘आयईसी’ टीम, जवान शेषराव वाघमारे आणि सफाईमित्र कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मोहिमेदरम्यान रस्ते झाडून चकाचक करण्यात आले. तसेच उघड्या गटारांमध्ये साचलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या व इतर कचऱ्याचे संकलन करून गटारे स्वच्छ करण्यात आली. केवळ सफाई करून न थांबता ‘आयईसी’ टीमने परिसरातील नागरिक व व्यावसायिकांशी संवाद साधला. ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करून तो महापालिकेच्या घंटागाडीतच देण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. रस्त्यांवर, गटारांत किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT