((अँकर))
............
अणदूरकरांच्या हृदयात तेवतेय नानांच्या मायेची ज्योत
२०१६ च्या दुष्काळात दिलेला ‘तो’ धीर अन् ‘हत्तीचे बळ’ आज ठरतेय प्रेरणा
अणदूर, ता. ८ (बातमीदार) ः ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (ता. आठ) पहाटे निधन झाल्याचे वृत्त समजताच तुळजापूर तालुक्यातील अणदूर परिसरात शोककळा पसरली. २०१५-१६ च्या भीषण दुष्काळात अणदूरकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकून, शेतकरी महिलांच्या अश्रूंना मायेचा स्पर्श देणाऱ्या नाना यांच्या जाण्याने अणदूरकरांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अणदूरचा ऐतिहासिक मेळावा
मराठवाड्याने २०१५-१६ मध्ये सोसलेला दुष्काळ विदारक काळ होता. पाण्यासाठी चाललेली वणवण, सुकलेली शेतं आणि त्यात पती गमावलेल्या एकल, परित्यक्ता महिलांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर... अशा कठीण प्रसंगी अणदूर येथे ‘हॅलो मेडिकल फाउंडेशन’ आणि नाम फाउंडेशनच्या वतीने १४ मार्च २०१६ ला दुष्काळग्रस्त एकल महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आवर्जून उपस्थिती लावून तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यातील ३०० हून अधिक एकल महिलांना एकत्र आणून थेट मदत व धीर दिला होता.
.........
((चौकट))
‘ताई, काय अडचण आहे’ने दिला जगण्याचा आधार
पांढरा शर्ट, विजार आणि पायात साधी चप्पल घालून थेट शेताच्या बांधावर आणि अणदूरच्या व्यासपीठावर आलेले नाना उपस्थितांना कधी नट वाटलेच नाहीत; ते अणदूरकरांना त्यांच्यातलेच एक शेतकरी आणि धीर देणारा ‘भाऊ’ वाटला. कोणताही अभिनिवेश न बाळगता व्यासपीठावरून खाली उतरून प्रत्येक महिलेच्या डोळ्यांत पाहत, ‘ताई, काय अडचण आहे?’ असा आपुलकीचा प्रश्न विचारणाऱ्या नानांच्या शब्दांनी महिलांच्या मनात जगण्याची आशा निर्माण केली. केवल आर्थिक मदत किंवा धान्यवाटप न करता, संकट मोठे आहे, पण तुमची हिंमत त्यापेक्षा मोठी असली पाहिजे. रडू नका, लढा! नाम तुमच्या पाठीशी आहे, या नानांच्या गर्जनेने दुष्काळाशी दोन हात करण्याचे हत्तीचे बळ दिले होते. या मेळाव्यात महिलांना आर्थिक साहाय्यासोबतच मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि समुपदेशन करण्यात आले होते.
.................................
((कोट))
२०१६ च्या दुष्काळात साध्या कपड्यांमध्ये आमच्या बांधावर आलेला हा माणूस आमच्यासाठी केवळ मदतीचा हात नव्हता, तर संकटकाळात पाठीवर हात ठेवणारा मोठा भाऊ होता. त्यांनी दिलेले ते शब्द आज ५-१० वर्षांनंतरही या भागातील महिलांना संकट काळात लढण्याची प्रेरणा देतात. नानांच्या निधनाने अणदूर परिसराची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
- बसवराज नरे, प्रकल्प समन्वयक, हॅलो मेडिकल फाऊंडेशन, अणदूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.