छत्रपती संभाजीनगर

जात पडताळणी समितीवर अर्जांचा वाढता भार

CD
NND26B03594 नांदेड : समाज कल्याण विभागाकडे जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्जांचा साचलेला ढीग. ---- जात पडताळणी समितीवर अर्जांचा वाढता भार --- प्रलंबित प्रकरणे निकाली काढताना अधिकाऱ्यांची दमछाक ---- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. ८ : जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी समाज कल्याण विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्जांचा मोठा ढीग साचला आहे. विद्यार्थी, शासकीय नोकरीतील उमेदवार तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून दररोज पाचशेहून अधिक अर्ज दाखल होत असल्याने समितीवरील कामाचा ताण वाढला आहे. वाढत्या अर्जसंख्येमुळे प्रलंबित प्रकरणे निकाली काढताना अधिकारी-कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रम, सरकारी नोकरी व विविध शासकीय योजनांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यात निवडणुकांची भर पडल्याने अर्जांची संख्या वाढली आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तातडीने अर्ज दाखल केले जात आहेत. नवीन अर्जांसोबत जुन्या प्रकरणांची छाननी, कागदपत्रांची पडताळणी, त्रुटींची पूर्तता, सुनावणी व अंतिम निर्णयाची प्रक्रिया समितीला करावी लागत आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या तुलनेत कामाचा भार वाढल्याने अतिरिक्त कर्मचारी व स्वतंत्र यंत्रणेची गरज निर्माण झाली आहे. --- ((कोट)) जात पडताळणी समितीकडे उपलब्ध झालेल्या फायली अनुक्रमानुसार निकाली काढल्या जात आहेत. यामध्ये बारावी, इंजिनिअरिंग तसेच वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फायलींचा समावेश आहे. त्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे काम सुरू आहे. -डॉ. छाया कुलाल, उपायुक्त, जात पडताळणी समिती, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

Ladki Bahin Yojana Installment Update : लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट; 'या' महिलांनाच मिळणार 1500 रुपये? योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर लगेच करा 'हे' काम

Latest Marathi News Live Update : सैपन बेगडे यांच्यासह चार जणांचा 'आदर्श पोलीस पाटील' म्हणून गौरव

दिवसाला ६० सिगारेट प्यायचे नाना पाटेकर; 'बहिणीचा 'तो' शब्द अन् नानांनी जागेवर सोडलं धूम्रपान

SCROLL FOR NEXT