छत्रपती संभाजीनगर

निवडणुकीमुळे शुक्रवारचा आठवडे बाजार राहणार बंद

CD
निवडणुकीमुळे शुक्रवारचा आठवडे बाजार राहणार बंद ---- नांदेड, ता. १९ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २३ ऑक्टोबर) नांदेड जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या परिसरात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. हे बाजार शनिवार (ता. २४ ऑक्टोबर) रोजी भरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधील शहरी व ग्रामीण भागांत एकूण १२० मतदान केंद्रांवर २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडावी, तसेच मतदान केंद्रांच्या परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक, पुणे यांच्या निर्देशानुसार संबंधित मतदान केंद्रांच्या परिसरातील आठवडे बाजार मतदानाच्या दिवशी बंद राहतील. मात्र, हे बाजार अन्य दिवशी भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार २३ ऑक्टोबर रोजी भरणारे संबंधित आठवडे बाजार २४ ऑक्टोबर रोजी भरविण्यात येणार आहेत. मार्केट अँड फेअर ॲक्ट, १८६२ मधील कलम ५ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हे आदेश जारी केले आहेत. संबंधित बाजार आयोजक आणि व्यापाऱ्यांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Hasan Mushrif Reaction : गोकुळचा अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया; महायुतीतील भांडणांवर भाष्य; ‘आम्ही निकाल स्वीकारला’

मुंबई ते राजस्थान, व्हाया सुरत! टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे आरोपी मुंबईतून कसे पसार झाले? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

46 Fours, 7 Sixes अन् नाबाद ४०० धावा! Ranji Trophy मध्ये चिन्मय सुतारचा पराक्रम; ७७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

Housing Society: हाउसिंग सोसायटीच्या कामांना द्या गती!

Latest Marathi News Live Update : बहुजन नेते कर्मवीर सुनील खांबे यांचे निधन

SCROLL FOR NEXT