NND26B03690 नांदेड : विद्यार्थ्यांचे स्वागत करताना संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, संचालक डॉ. गीता लाठकर, यशवंत जोशी, शिरीष कोटगिरे.
------
वेळेच्या नियोजनातून यश निश्चित : कदम
नांदेड : वेळ ही अशी संपत्ती आहे, जी साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करून दिवसाची कामे त्याच दिवशी पूर्ण करण्याची सवय लावून घ्यावी. नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन एमजीएम संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी केले. एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथमवर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता एस. लाठकर, प्रोफेसर एमेरिटस डॉ. यशवंत जोशी, उपप्राचार्य डॉ. शिरीष कोटगीरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. प्रथमवर्ष अभियांत्रिकी परीक्षेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थाध्यक्ष कमलकिशोर कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विभागप्रमुख डॉ. जसबीरसिंग सिद्धू, एस. ए. हाश्मी, डॉ. कल्पना जोंधळे-पैठणे, डॉ. अर्शद हाश्मी, डॉ. एम. वाय. जोशी, प्रशिक्षण व रोजगार अधिकारी प्रा. शिवप्रसाद तितरे, ग्रंथपाल डॉ. गोविंद हंबर्डे, शैक्षणिक समन्वयक डॉ. मुत्तेपवार, प्रथमवर्ष अभियांत्रिकी प्रमुख प्रा. राहुलकुमार शर्मा, प्रा. नारायण कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. किरण देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.