bhagwat karad bhagwat karad
छत्रपती संभाजीनगर

नांदेड-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण करू: भागवत कराड

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर (जि.औरंगाबाद) : नांदेड-मनमाड या रेल्वेमार्गाचे (Nanded-Manmad Railway Track) विद्युतीकरण आणि दुहेरीकरण हे वैजापुरकरांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) प्रयत्नशील आहोत. विशेष म्हणजे विद्युतीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून दुहेरीकरण मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे वैजापुरकरांचे हे स्वप्न पूर्ण करू तसेच इतर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी वैजापुरकरांना दिला आहे. भाजपच्‍या जनआशीर्वाद यात्रेचे (Jan Ashirwad Yatra) निमित्त शनिवारी (ता.२८) वैजापूर शहरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यात्रेचे शहरात (Vaijapur) आगमन होताच जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कराड यांच्या स्वागतासाठी शहर परिसरात सर्वच ठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण शहर हे भाजपमय झाले होते.

जनआशीर्वाद यात्रेच्या रथामध्ये आमदार अतुल सावे, प्रदेश चिटणीस प्रवीण घुगे, प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरूळे यांची उपस्थिती होती. डॉ. कराड म्‍हणाले की, केंद्र सरकारच्या कारभारावर अर्थात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या सात वर्षात ज्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारच्या योजना हाती घेतल्या आणि कोरोनासारख्या संकटात प्रभावी काम करत सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याचे रक्षण केलं. तसेच रेल्वेच्या प्रश्नावर केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयाचा निधी मराठवाड्यात दिलेला आहे. दरम्यान मी मराठवाड्याचा सुपुत्र असून प्रत्येक भौतिक विकास प्रश्नांची मला जाण आहे. आगामी काळात काम करताना सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन ज्या विकास प्रश्नाचे प्रस्ताव माझ्याकडे येतील, त्यासाठी मी निधी कमी पडू देणार नाही, अशा प्रकारची ग्वाही त्यांनी ठक्कर बाजार येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT