राज्यराणी एक्स्प्रेस एलएचबी डब्यांसह धावणार
----------
नांदेड-पनवेल, नांदेड-हडपसर एक्स्प्रेसला कायमस्वरूपी तीन डबे वाढणार
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २० ः प्रवाशांची वाढती मागणी, प्रवासातील सुविधा लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातून धावणाऱ्या नांदेड-पनवेल, नांदेड- हडपसर एक्स्प्रेसच्या डब्यांत आता कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गाड्यांना प्रत्येकी तीन डबे वाढविण्यात येणार असून, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसचे विद्यमान आयसीएफ डबे बदलून आधुनिक एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नांदेड-पनवेल-नांदेड एक्स्प्रेसची सध्याची १७ एलएचबी डब्यांची रचना आता २० डब्यांची करण्यात येणार आहे. यात एक द्वितीय श्रेणी वातानुकूलित, एक तृतीय श्रेणी वातानुकूलित आणि एक स्लीपर डबा कायमस्वरूपी वाढविण्यात आला आहे. सुधारित रचनेनुसार रेल्वेत २ एसी २-टियर, ६ एसी ३ - टियर, ६ स्लीपर, ४ सामान्य श्रेणी, १ एसएलआर आणि १ गार्ड तथा दिव्यांगांसाठी राखीव डबा असेल. ही डबेवाढ नांदेडहून २२ सप्टेंबर आणि पनवेलहून २३ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. नांदेड - हडपसर - नांदेड एक्स्प्रेसच्या सध्याच्या १७ एलएचबी डब्यांमध्येही तीन डब्यांची कायमस्वरूपी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या रेल्वेची एकूण डब्यांची संख्या २० होणार आहे. यामध्ये एक एसी २ - टियर, एक एसी ३ - टियर आणि एक स्लीपर डबा वाढविण्यात आला आहे. सुधारित रचनेत २ एसी २ - टियर, ६ एसी ३ - टियर, ६ स्लीपर, ४ सामान्य श्रेणी, १ एसएलआर आणि १ गार्ड तथा दिव्यांगांसाठी राखीव डबा असेल. ही वाढ नांदेडहून २४ सप्टेंबर आणि हडपसरहून २५ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. या कायमस्वरूपी डबेवाढीमुळे नांदेडहून पनवेल व हडपसर तसेच परतीच्या प्रवासात उपलब्ध आसनक्षमता वाढणार असून, वाढत्या प्रवासी मागणीची पूर्तता होण्यास मदत होणार आहे.
---
चार नोव्हेंबरपासून आधुनिक डबे
मराठवाड्यातील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी असलेल्या नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) राज्यराणी एक्स्प्रेसचेही रूपांतर आधुनिक एलएचबी डब्यांत करण्यात येणार आहे. नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेसचे विद्यमान आयसीएफ डबे बदलून एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत. नांदेडहून सुटणाऱ्या रेल्वेसाठी ही व्यवस्था ४ नोव्हेंबरपासून, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या रेल्वेसाठी ५ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.
((चौकट)))
राज्यराणीची सुधारित रचना १६ डब्यांची
राज्यराणी एक्स्प्रेसचे संचालन दोन एलएचबी रेकद्वारे करण्यात येणार असून, सुधारित रचना एकूण १६ डब्यांची असेल. यात १ द्वितीय सामान-सह-दिव्यांगजन डबा, ४ सामान्य डबे, ५ स्लीपर डबे, १ एसी चेअर कार, २ एसी ३-टियर, १ एसी २-टियर, १ फर्स्ट एसी आणि १ सामान-सह-गार्ड डबा (जनरेटर व ब्रेक व्हॅनसह) यांचा समावेश असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.