छत्रपती संभाजीनगर

गुलाम सादिक यांच्याकडून स्वच्छता विभागाचा पदभार काढला

CD
डम्पिंग ग्राउंडवरील कचरा प्रकरण भोवले; रावण सोनसळे नवे कारभारी नांदेड, ता. २९ : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील सहायक आयुक्त गुलाम सादिक यांच्याकडील स्वच्छता विभागाचा पदभार अखेर काढून घेण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी यासंदर्भातील आदेश दिले असून, इतवारा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त रावण सोनसळे यांच्याकडे स्वच्छता विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या प्रकरणानंतर ही प्रशासकीय कारवाई झाल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गुलाम सादिक यांच्याकडे स्वच्छता विभागाचा पदभार होता. पदोन्नतीनंतरही त्यांनी सुमारे दोन वर्षे हा पदभार कायम ठेवल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान, डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या प्रकरणावरून लोकन्याय विकास आघाडीने थेट विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. या प्रकरणामुळे स्वच्छता विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांशी विविध मुद्द्यांवरून चर्चेत राहिलेले गुलाम सादिक यांच्याकडून स्वच्छता विभागाची जबाबदारी काढून घेण्याच्या निर्णयाकडे महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदल म्हणून पाहिले जात आहे. आता रावण सोनसळे यांच्याकडे या विभागाची सूत्रे देण्यात आली असून, शहरातील स्वच्छता व्यवस्था, कचरा संकलन आणि विल्हेवाटीच्या कामकाजाबाबत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

Latest Marathi News Update: सरपंच मंगेश साबळे यांनी भीमाशंकर येथे होणाऱ्या वृक्षतोडीचा केला विरोध

Meenakshi Shinde Resign: ठाण्यात मोठी घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण; मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

SCROLL FOR NEXT