छत्रपती संभाजीनगर

क्राईमच्या चार बातम्या....

CD
तामसा येथे घरफोडीत दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास नांदेड : तामसा येथील संभाजीनगर भागात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम, असा एकूण दोन लाख चार हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ९ ऑक्टोबरच्या पहाटे तीनच्या सुमारास घडली. बालाजी बापूराव चंदनवार (वय ४७, रा. संभाजीनगर, तामसा) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील दागिने व रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी चंदनवार यांच्या तक्रारीवरून तामसा ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक खेडकर तपास करीत आहेत. --- हिमायतनगर परिसरातून तीन म्हशींची चोरी नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील घारापूर शिवारातील शेतातील आखाड्यावर बांधलेल्या तीन म्हशी, ज्यांची किंमत एक लाख ६५ हजार रुपये आहे, अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात ते ९ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा या कालावधीत घडली. अनंतराव गणपतराव माने यांच्या आखाड्यावर या म्हशी बांधलेल्या होत्या. संधी साधून चोरट्यांनी तीनही म्हशी पळविल्या. याप्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पोलिस हवालदार आऊलवार तपास करीत आहेत. ---- अवैध वाळू वाहतुकीचे दोन टेंपो जप्त नांदेड : शहरात विनापरवाना वाळूची वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने निघालेल्या दोन टेम्पोंवर इतवारा आणि वजिराबाद पोलिसांनी कारवाई केली. दोन्ही कारवायांत वाळूसह दोन टेम्पो जप्त करण्यात आले. इतवारा भागातील मंढई हनुमान मंदिर रस्त्यावर ९ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.४० वाजता गौतम नामदेव काळे (वय ६५, रा. चौफाळा, नांदेड) आणि दीपक नथू जाधव (वय ४५, रा. इतवारा) हे एक ब्रास वाळूची विनापरवाना वाहतूक करताना आढळले. याप्रकरणी इतवारा ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, पोलिस हवालदार जावेद तपास करीत आहेत. दुसऱ्या कारवाईत हस्सापूर रस्त्यावर ९ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता शेख वसीम शेख करीम (वय २६, रा. सैलाबनगर, नांदेड) हा एक ब्रास वाळूची विनापरवाना वाहतूक करताना आढळला. याप्रकरणी वजिराबाद ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, पोलिस हवालदार अकमवाड तपास करीत आहेत. ---- भोकरमध्ये दारूची अवैध वाहतूक नांदेड : भोकर येथील आंबेडकर चौकात विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून सात हजार ४० रुपये किमतीची देशी दारू आणि ३० हजार रुपये किमतीची दुचाकी, असा मुद्देमाल जप्त केला. आठ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास ही कारवाई केली. सूरज लाला रुमनवाड (वय २८, रा. बोरगाव, ता. भोकर) हा दुचाकीवरून विक्रीच्या उद्देशाने देशी दारूची वाहतूक करीत असल्याचे आढळले. त्याच्याकडे दारू वाहतुकीचा परवाना नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भोकर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस हवालदार केळकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

गद्दार, देशद्रोही! अभिजीत दीपके अन् सौरभ दास यांचा विमानातील प्रवाशांशी वाद; नेमकं काय घडलं?

Pune News : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; शनिवार वाड्याजवळ कार्यकर्ते ताब्यात

Marathi News Live Updates : ‘देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही’; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Bank Holiday: नवरात्रीत बँका बंद राहणार की सुरू? 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT