छत्रपती संभाजीनगर

नांदूरघाट ग्रामपंचायत अंतर्गत

CD
नांदूरघाट ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांचे उपोषण बीड, ता. २ : घोटाळे आणि कथित वसुलीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेली नांदूरघाट ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींची कामे प्रत्यक्षात न करताच कुशल व अकुशल कामाची रक्कम उचलल्याचा आरोप करीत शेतकरी अमोल जाधव, नितीन जाधव आणि अमोल सखाराम जाधव सोमवार (ता. ३१) पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मागील चार वर्षांपासून रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींची कामे प्रत्यक्षात न करता कुशल व अकुशल कामाची पूर्ण रक्कम उचलून अपहार केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने विहिरींची कामे बोगस असल्याचा अहवाल दिला असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, गावातील टोरंटो सौरऊर्जा प्रकल्पाकडून ग्रामपंचायतीने किती कर वसूल केला, प्रकल्पासाठी नाहरकत दाखला देताना सूचक-अनुमोदक कोण होते आणि कंपनीकडून मिळालेल्या सीएसआर निधीचा वापर कुठे करण्यात आला, याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनाही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. बोगस विहिरींच्या कामातील दोषींवर गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम वसूल करावी, सौरऊर्जा कंपनीकडून वसूल केलेला कर आणि सीएसआर निधीच्या वापराची चौकशी करावी, अनुपस्थित ग्रामसेवक व रोजगार सेवकांवर कारवाई करून रखडलेली विकासकामे सुरू करावीत, या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

सर्किटचा ‘डार्क’ अवतार! अर्शद वारसीच्या ‘महाराज’ भूमिकेने वाढवलं ‘घमासान’चं गूढ, खाकी वर्दीत प्रतीक गांधींचा दमदार अंदाज

SCROLL FOR NEXT