नरेंद्र मोदी 
छत्रपती संभाजीनगर

'मोदी पुन्हा सत्तेत आल्यास देशाचे ऐक्य, प्रगती धोक्यात'

अकराव्या पंचवार्षिक योजनेत काँग्रेसने माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि अन्नसुरक्षेचा अधिकार दिला. मात्र, हे लोकांपर्यंत घेऊन जाण्यात काँग्रेस अपयशी ठरली.

अतुल पाटील

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सरकारची वाटचाल गोळवलकरांच्या विचारांवर सुरू आहे. मोदी पुन्हा सत्तेत आले तर देशाचे ऐक्य, प्रगती, सलोखा आणि स्वातंत्र्य धोक्यात येईल, अशी भीती अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर (Ecomics Expert Bhalchandra Mungekar) यांनी व्यक्त केली. लोकसंवाद प्रतिष्ठानतर्फे रविवारी (ता. सोळा) राज्यसभेचे माजी खासदार, नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि मुंबई विद्यापीठाचे (Mumbai University) माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे ‘वर्तमानातील राजकारण’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान झाले. संवादमालेच्या सुरवातीला कॉंग्रेसचे(Congress) दिवंगत खासदार राजीव सातव (Rajee Satav) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (Narendra Modi If Again Come Into Power, Nation Unity Will Be In Denger, Said Bhalchandra Mungekar)

डॉ. मुणगेकर म्हणाले, ‘अकराव्या पंचवार्षिक योजनेत काँग्रेसने माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि अन्नसुरक्षेचा अधिकार दिला. मात्र, हे लोकांपर्यंत घेऊन जाण्यात काँग्रेस अपयशी ठरली. ही पोकळी मोदींनी भरून काढली आणि फायदा करून घेत सत्ता मिळवली. आता भारताची आर्थिक स्थिती २०१४ पासून घसरत आहे. नोटबंदीचा बेजबाबदार निर्णय मोदींनी घेतला. त्या दिवशी लोकांकडे १४ लाख कोटी रुपये रोख रक्कम होती. ती रक्कम त्यांच्या हातातून गेली. काळा पैसा, कॅशलेस इकॉनॉमी ही स्वप्नच राहिली. कोरोनाने अर्थव्यवस्थेला आणखीणच खड्ड्यात घातले.’ ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) यांना मोडीत काढायचे या एकाच हेतूने मोदींनी बंगालमध्ये (West Bengal) ठाण मांडले. कोरोना संसर्गाच्या काळातही जाहीर सभा घेणे आणि कुंभमेळा भरवण्यास परवानगी देणे, ही घोडचूक असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसंवादचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी केले. सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले.

मुसोलिनीच्या धर्तीवर संघाची रचना

संघाच्या सहाशे संघटना आणि साठ लाख स्वयंसेवक आहेत. त्या सर्वांच्या हातात काठ्या आहेत. हे सगळे मुसोलिनीच्या फॅसिस्ट संघटनेच्या धर्तीवर सुरू आहे. मोदींना या सगळ्याचे पाठबळ आहे. न्यायव्यवस्था कोसळली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचे सांगतात. या देशातल्या गरिबांचाही न्यायालयावर विश्वास आहे. तो ज्या दिवशी उडेल, तेव्हा अराजक माजेल, अशी भीती डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT