Nath Temple Paithan 
छत्रपती संभाजीनगर

एकादशीनिमित्त उद्या नाथ मंदिर राहणार एक दिवस बंद, कोरोनामुळे प्रशासनाचा निर्णय

चंद्रकांत तारू

पैठण (जि.औरंगाबाद)  : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पैठण येथील शांतिब्रह्म संत  एकनाथ महाराज यांचे गोदाकाठावरील समाधी मंदिर व गावातील राहतावाडा असलेले नाथमंदिर मंगळवारी (ता.२३) महिन्याच्या एकादशी ( वारी) निमित्त होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे एक  दिवस बंद ठेवण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सोमवारी (ता.२२) दिली.


पैठण शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अनमोल सागर यांच्या आदेशानुसार  संत एकनाथ मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे यांना मंदिर एक दिवसासाठी बंद ठेवण्यात यावे, असे लेखी आदेश दिले आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात शिथिलता देण्यात आल्यानंतर भाविकांच्या  दर्शनासाठी नाथमंदिर खुले करण्यात आले होते.

यामुळे भाविकांचे दर्शन सुरु झाले असुन आज ही दर्शनासाठी पंचक्रोशिसह दुर अंतरावरुन येत आहे. परंतु आता कोरोना साथीची दुसऱ्या लाटेची शक्यता सरकारी पातळीवर व्यक्त केली गेल्यामुळे पुन्हा कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश तालुका प्रशासनाने दिले आहे. उद्या मंगळवारी (ता.२३) होणाऱ्या एकादशी वारी निमित्त भाविकांना नाथांचे बाहेरुन दर्शन घ्यावे लागणार आहे. या दर्शनासाठी  प्रशासनाने परवानगी दिली आहे. तसेच गर्दी न करता दर्शन घ्यावे, असे आवाहन ही केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : अभिजीत दिपकेंना लक्ष्मण हाकेंचा सणसणीत टोला; म्हणाले, ‘आधी...

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT