Sakshi Jadhav sakal
छत्रपती संभाजीनगर

Sakshi Jadhav : खेळासह अभ्यासातही साक्षी जाधव अव्वल ; परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय कबड्डीपटूने दहावीत मिळवले ९५ टक्के गुण

खेळामध्ये ती अव्वल आहे. राज्य, राष्ट्रीय पातळीवर तिने आपला ठसा उमटवला आहे. ती मैदानात आहे म्हटल्यावर प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरते.

सकाळ वृत्तसेवा

परभणी : खेळामध्ये ती अव्वल आहे. राज्य, राष्ट्रीय पातळीवर तिने आपला ठसा उमटवला आहे. ती मैदानात आहे म्हटल्यावर प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरते. खेळात राष्ट्रीय पातळी गाठत असतानाच तिने अभ्यासातही आपण मागे नसल्याचे दाखवून देत नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात ९५ टक्के गुण मिळविले आहेत. ती आहे कबड्डीची राष्ट्रीय खेळाडू साक्षी थावरू जाधव. तिच्या या कामगिरीने तिने आपल्या आई-वडिलांसोबतच जिल्ह्याचीही मान उंचावली आहे.

गंगाखेड येथील आनंदवन विद्यालयात शिकणारी व आनंदवन क्रीडा मंडळाच्या मैदानावर कबड्डीचे धडे गिरवणारी साक्षी हिचा जन्म गंगाखेड तालुक्यातील छोट्याशा खळी तांड्यावर झाला. वडील थावरु जाधव व आई प्रणिता या अल्पभूधारक, त्यावरच कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. साक्षीचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेत झाले तर पुढील शिक्षणासाठी तिने गंगाखेड येथील आनंदवन विद्यालयात प्रवेश घेतला. परंतु, तिथे गेल्यानंतर ती कबड्डीकडे वळली. घरच्यांनी सुरुवातीला विरोध केला. परंतु संस्थाध्यक्ष राजेश राठोड, मुख्याध्यापक विलास राठोड यांनी खेळाचे फायदे सांगीतल्यानतंर मात्र पालकांनी होकार दिला व गत दोन वर्षापासून अभ्यासाबरोबरच साक्षीने कबड्डीवर देखील आपले लक्ष केंद्रीत केली आहे.

अष्टपैलू साक्षीची दमदार वाटचाल

साक्षी ही अष्टपैलू व गुणवंत खेळाडू आहे. ती उत्कृष्ट चढाईपटू तर आहेच परंतु कोपरा रक्षक, मध्यरक्षक म्हणून देखील ती संघासाठी उपयोगी आहे. गतवर्षी साक्षीचा समावेश असलेल्या आनंदवन विद्यालयाच्या १४ वर्षाआतील मुलींच्या संघाने ,शालेय राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली होती. परंतु यश हाती आले नाही. सन २०२४-२५ च्या हंगामात मात्र आनंदवनच्या १७ वर्षाआतील मुलींच्या संघाने शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

साक्षीने या स्पर्धेत एक चढाईपट्टू म्हणून जोरदार कामगिरी केली. ही कामगिरी सुवर्णपदकाला गवसणी घालणारी ठरली. तसेच साक्षीचा समावेश असलेल्या परभणी जिल्ह्याच्या किशोरी गटाच्या संघाने पुणे येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत कास्यपदक पटकावले. या संघातील साक्षीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. राष्ट्रीय स्पर्धा बिहार राज्यात झाल्यात. या स्पर्धेत साक्षीने उजवा कोपरा रक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. परंतु ती संघाला पदक मिळवून देऊ शकली नाही.

माझे ध्येय हे एक आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू होण्याचे आहे. माझ्या कुटूंबाला, गुरुंना माझा अभिमान वाटावा म्हणून आयपीएस देखील व्हायचे आहे. त्यासाठी वाट्टेल ती कष्ट, मेहनत करण्याची माझी तयारी आहे.

– साक्षी थावरु जाधव

राष्ट्रीय कबड्डीपटू, गंगाखेड

साक्षी खेळात जशी चपळ, चतुर आहे तशीच अभ्यासात देखील पुढे आहे. याच वर्षी शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावले. त्यासाठी देखील तिने भरपुर वेळ दिला त्याच बरोबर उर्वरीत वेळ वाया न घालवता दहावीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. त्याचे फळ तिला मिळाले असून तिने दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण प्राप्त केले आहे. साक्षी जे ध्येय ठेवते ते निश्चित साध्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT