छत्रपती संभाजीनगर

नॅचरल डेअरी वर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

CD
ABD26J80749 वैजापूर ः दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करताना अन्न व औषध प्रशासनाचे पथक. ‘नॅचरल डेअरी’चा परवाना निलंबित - ‘एफडीए’ची वैजापूरमध्ये कारवाई; अस्वच्छतेसह गंभीर बाबी समोर वैजापूर, ता. ५ (बातमीदार) : येथील रामगिरीनगर परिसरातील ‘नॅचरल डेअरी’वर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी (ता. पाच) कारवाई केली. तपासणीदरम्यान डेअरीचा प्रकल्प अत्यंत अस्वच्छ अवस्थेत आढळून आल्याने डेअरीचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. तसेच मानकांची पूर्तता न करणाऱ्या सुमारे ४२ हजार ८८० रुपये किमतीचा पनीर, क्रीम आणि तुपाचा साठा जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या पथकाने ही अचानक तपासणी केली. अन्न व औषध प्रशासनाच्या निकषांनुसार केलेल्या तपासणीत या डेअरीला ९४ पैकी अवघे १५ गुण मिळाले असून, अन्न सुरक्षा मानकांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे. तपासणीदरम्यान डेअरीची फरशी तुटलेली, उघडे दरवाजे आणि खिडक्यांना कीटक प्रतिबंधक जाळ्यांचा अभाव दिसून आला. प्रकल्पात वापरले जाणारे पाणी पिण्यायोग्य असल्याचा कोणताही प्रयोगशाळा अहवाल नव्हता. याशिवाय, दूध साठवण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या टाक्यांऐवजी प्लॅस्टिकच्या कॅनचा वापर होत असल्याचे आढळले. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असणे आणि कीटक नियंत्रणाबाबत दुर्लक्ष झाल्याचेही स्पष्ट झाले. चौकट नोंदवह्या, सुरक्षा साधनांचा अभाव डेअरीत संकलित होणाऱ्या दुधाची प्राथमिक चाचणी, तापमानाची नियमित नोंद तसेच भेसळ तपासणीची कोणतीही नोंदवही उपलब्ध नव्हती. दूध हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ॲप्रन, हातमोजे आणि हेडगेअर नव्हते, तसेच त्यांना अन्न सुरक्षेचे कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. चौकट ९८ किलो साठा केला नष्ट या कारवाईदरम्यान ५९ किलो पनीर, ११ किलो क्रीम आणि २८ किलो तूप असा एकूण ९८ किलो भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. अन्न सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांवर अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT