छत्रपती संभाजीनगर

''नवदृष्टी महाअभियाना''त ५,५७० रुग्णांची नेत्रतपासणी ४५३ जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

CD
नवदृष्टी महाअभियानातून ५ हजार ५७० रुग्णांची नेत्रतपासणी घनसावंगी, ता. ५ : ‘नवदृष्टी महाअभियाना’त १ ते ३० सप्टेंबरदरम्यान तब्बल ५ हजार ५७० रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार २७० रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. यातील ४५३ रुग्णांवर पुणे येथील एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दरम्यान, माजी खासदार ॲड. अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री राजेश टोपे यांच्या संकल्पनेतून सदर अभियान राबविण्यात आले. सुमारे दहा वर्षांपूर्वी जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथील ज्येष्ठ नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या पथकाने मतदारसंघातील सुमारे तीन हजार रुग्णांची नेत्र तपासणी केली होती. त्यामध्ये ५०० रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले होते. या सर्व रुग्णांवर शस्त्रक्रिया करून देण्याचा शब्द डॉ. लहाने यांनी दिला होता. त्यानंतर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या संकल्पनेतून ‘नवदृष्टी महाअभियाना’ला सुरवात झाली. यंदा १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत ५ हजार ५७० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार २७० रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. यातील ४५३ रुग्णांवर पुणे येथील एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांच्या साहाय्याने मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्ण सुखरूपपणे घरी परतले. .................. कोट सदर अभियानात आम्ही गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहोत, याचा मनस्वी आनंद आहे. नवदृष्टी मिळाल्यानंतर रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी ‘नवदृष्टी महाअभियान’ तसेच एच.व्ही. देसाई हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. - प्रा. अशोक शिंदे, प्रमुख, नवदृष्टी महाअभियान ...... कोट अंकुशराव टोपे यांचा विचार कृतीत आणण्यासाठी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘नवदृष्टी महाअभियान’ ही चळवळ व्यापक करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. रुग्णांच्या मोतीबिंदूचे निदान करून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. - राजेश टोपे, माजी आरोग्यमंत्री

Nobel Prize 2026: वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा! 'या' तीन दिग्गज व्यक्तींच्या नावांचा समावेश

निरागस वासू साकारला, आता नजर खलनायकाच्या भूमिकेवर; राज कुंदन म्हणतो, “मला पुढे मांजरेकर सरांसोबत...”

Mohan Joshi : मोहन जोशी हे महाराष्ट्राचा अभिमान ;उद्योगमंत्री उदय सामंत : संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

भाजपने राज्यसभेच्या ८ उमेदवारांची केली घोषणा, केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गजांचा पत्ता कट; योगींच्या मंत्र्याची वर्णी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT