Sambhaji Nagar News sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : सातशे उंबऱ्यांच्या गावात ६५ डॉक्टर ; पैठणचे नवगाव ठरतेय आदर्श

शिक्षणाचे महत्त्व पटल्याने वादविवाद टाळून संपत्ती मिळविण्याची स्पर्धा न करता पैठण तालुक्यातील नवगाव येथील ग्रामस्थ आपल्या पाल्यांना शिक्षणाचे बाळकडू देत आहेत. यामुळे अवघ्या सातशे उंबऱ्यांच्या गावातून ६५ डॉक्टर वैद्यकीय सेवा बजावत असून, १०३ शिक्षक ज्ञानार्जनाचे काम करतात.

सकाळ वृत्तसेवा

पाचोड : शिक्षणाचे महत्त्व पटल्याने वादविवाद टाळून संपत्ती मिळविण्याची स्पर्धा न करता पैठण तालुक्यातील नवगाव येथील ग्रामस्थ आपल्या पाल्यांना शिक्षणाचे बाळकडू देत आहेत. यामुळे अवघ्या सातशे उंबऱ्यांच्या गावातून ६५ डॉक्टर वैद्यकीय सेवा बजावत असून, १०३ शिक्षक ज्ञानार्जनाचे काम करतात. तालुक्यात नवगावची ‘डॉक्टरांचे गाव’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. विद्यार्थी, तरुणांची शिक्षणासाठीची धडपड आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्रोत्साहन, ही गोष्ट आदर्शवादी मानली जात आहे.

गावात सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गावाचे भौगोलिक क्षेत्र २ हजार २६४ हेक्टर असून, वहितीखाली लागवडीयोग्य क्षेत्र १ हजार ९०० हेक्टर आहे. गोदावरी नदीकाठामुळे परिसरात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. १ हजार ४०० हेक्टर क्षेत्र बारमाही बागायती क्षेत्र आहे. गावात जिल्हा परिषदेसह खासगी शैक्षणिक संस्था असून, ७२२ कृषी खातेदार आहेत. येथील ग्रामस्थांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ६५ मुलांना जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर उच्चविद्याविभूषित करून डॉक्टर, तर १०३ जणांना शिक्षक, दोघांना कायदेतज्ज्ञ बनविले आहे. विशेष म्हणजे ६५ वैद्यकीय पदवीधरांत ३९ मुस्लिम तरुण-तरुणींचा समावेश आहे.

गावाचे नाव राज्यपातळीवर

आजपर्यंत गावातील २५ महिला आणि ४० पुरुषांनी वैद्यकीय पदव्या संपादन केल्या आहेत. यात एमबीबीएस ११, एमडी ४, बीएएमएस ८, बीएचएमएस ३३, डीएचएमएस २, बीडीएस ४ असे एकूण ६५ जण वैद्यकीय क्षेत्रात पदवीधर आहेत. गावात जवळपास बहुतांश जण पदवीधर असून, काही जणांनी राजकारणात राज्य स्तरावर नाव कमावले आहे. त्यात इब्राहिम पठाण, डॉ. गुलदाद पठाण, महंमद हनिफ, शेरूभाई पठाण, वहीद पठाण व डॉ. शरिफ पठाण यांची नावे प्रकर्षाने घेतली जातात.

गावातील सर्व नागरिकांना एकमेकांप्रति आपुलकी आहे. गावात क्षुल्लक कारणावरून वाद आणि बंद अद्याप झाल्याचे स्मरणात नाही. विशेषतः या गावांसह तुळजापूर व रामनगर ही संयुक्त सतरा सदस्यीय ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. त्यामुळे आता गावाच्या विकासासाठी नवगावला स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण व्हायला हवी.

— डॉ. शरीफ पठाण, उपसरपंच

गावात संपत्तीपेक्षा शिक्षणाला महत्त्व देणारे लोक आहेत. आजच्या काळात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. एकवेळ जेवायची भ्रांत कायम राहिली तरी चालेल, परंतु शिक्षणापासून कुटुंबातील सदस्य वंचित राहू नयेत, यासाठी सर्व जण काळजी घेतात. शिक्षणासाठी सर्व जण स्पर्धा करतात. आगामी काळात गावातून अनेक मुले-मुली अधिकारी होऊन गावाचे नाव उज्ज्वल करतील, हे तितकेच खरे.

— डॉ. गुलदाद पठाण, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT