ambabai  sakal
छत्रपती संभाजीनगर

Navratri 2023 : कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचे उपपीठ कडेठाण

नवरात्रोत्सवात येथे देवीचा उत्सव असतो. नवरात्रात नऊ दिवस भव्य यात्रा भरते. तिसऱ्या, पाचव्या व सातव्या माळेला विशेष गर्दी जमते.

हबीबखान पठाण

पाचोड - ऐतिहासिक वारसा असलेल्या श्रीक्षेत्र कडेठाण (ता. पैठण) येथील महालक्ष्मीचे मंदिर हे कोल्हापूर निवासिनी अंबाबाईचे उपपीठ मानले जाते. सध्या नवरात्रोत्सव सुरु असल्याने येथे राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत आहे. श्रीक्षेत्र कडेठाण नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या गावाचे आजचे प्रचलीत नाव कडेठाण असे आहे. जुन्या कटिस्थान या नावाचा अपभ्रंश होऊन कडेठाण हे नाव प्रचलित झाले आहे. गावाच्या मध्यभागी अंबादेवीचे कोरीव बांधकाम असलेले पुरातन मंदिर आहे. मंदिरात महालक्ष्मींच्या डाव्या व उजव्या बाजूला रेणुकादेवी व तुळजाभवानी आहेत. मंदिराच्या प्रवेशव्दारातून आत गेल्यानंतर दगडी बांधकाम असलेल्या भव्य दीपमाळा आहेत. देवीच्या अग्रणी भागात गणेश मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात पूर्वीच्याच चारी बाजूंनी कमानी आहे.

महालक्ष्मी मंदिराच्या उजव्या बाजूस महादेवाचे मंदिर आहे. महादेव मंदिराच्या उजव्या बाजूस दगडी पायऱ्या असलेली बारव आहे. त्यास कल्लोळ म्हणतात. येथील मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे असून रेखीव खांबावर सुंदर चित्रे कोरलेली आहेत. प्रवेशव्दारावर द्वारपालाचे रेखीव चित्र असून मंदिराच्या परिसरात शेषपायी भगवान विष्णूंची मूर्ती आहे. या गावात फेरफटका मारला असता एकेकाळी ही वैभवसंपन्न नगरी असावी असे येथील भव्य दगडी वाड्यांच्या अवशेषांवरुन दिसून येते. नवरात्रोत्सवात येथे देवीचा उत्सव असतो. नवरात्रात नऊ दिवस भव्य यात्रा भरते. तिसऱ्या, पाचव्या व सातव्या माळेला विशेष गर्दी जमते.

नवरात्रीच्या नऊ दिवस विविध कार्यक्रम

नवरात्रीच्या नऊ दिवसात कथा, कीर्तन,भजन, प्रवचन, पोथी, भारुड आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस ''सप्तशती''चा पाठ होतो. सकाळ संध्याकाळ पूजा, आरती करण्यात येत आहे. भाविकांसाठी ग्रामस्थ व व्यवस्थापन समिती परिश्रम घेत आहे. मंदिर विश्वस्तांसह ग्रामस्थ आरोग्य तपासणी, विनामूल्य उपचार, आरोग्य शिक्षण असे उपक्रम हाती घेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT