छत्रपती संभाजीनगर

आई राजा उदो उदो... आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ

CD
आई राजा उदो उदो... आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ ---- घराघरांत उत्साहाचे वातावरण, मंदिरात व मंडळांमध्ये घटस्थापना --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ११ : घराघरांत फुलांची आकर्षक सजावट... प्रवेशद्वारावर आंब्यांच्या पानांचे लावलेले तोरण... रांगोळ्यांच्या पायघड्या... मंदिरांवर पताके, ध्वज अन्‌ नयनरम्य विद्युत रोषणाई... ‘आई राजा उदो उदो...’चा स्फूर्तिदायी जयघोष... भक्तिगीतांबरोबरच घुमणारे आरत्यांचे मंजूळ स्वर... धूप अन्‌ अगरबत्त्यांचा दरवळणारा गंध... पारंपरिक वाद्यांचा निनाद... अशा चैतन्यदायी वातावरणात व अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर घटस्थापना करीत शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार (ता. ११) पासून प्रारंभ झाला. भक्ति आणि शक्तीचे प्रतीक असलेला हा आनंददायी उत्सव पुढील नऊ दिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. आदिमायेच्या आराधनेचा आणि स्त्रीशक्तीच्या जागराचा उत्सव असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाची घराघरांत, मंदिरांत आणि मंडळांमध्ये आठवडाभरापासून जय्यत तयारी केली जात होती. मंदिरांत रंगरंगोटी करणे, मंडप उभारणे, घरांची स्वच्छता करणे, घटस्थापनेसाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करणे यात अनेकजण रमले होते. उत्सवानिमित्ताने शहरातील बाजारपेठही सजावटीच्या विविध आकर्षक वस्तूंनी सजली होती. या वस्तूंबरोबरच पूजेचे साहित्य व फुलांची खरेदी करण्यासाठी रविवारी (ता. ११) सकाळीही बाजारपेठेत चांगलीच लगबग पहायला मिळाली. परडी, काळी माती, धान्य, विड्याची पाने, आंब्याची पाने, फुले, तोरण, नारळ असे साहित्य आवर्जून घेतले जात होते. त्यानंतर सकाळी दहापासूनच ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने व मंगलमय वातावरणात घटस्थापना केली जात होती. कोणी पारंपरिक वाद्यांच्या गजरात, तर कोणी शहरात मिरवणुका काढत घटस्थापना करीत होते. मंडळांच्या वतीने रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू असल्याचे पाहायला मिळाले. --- गंजगोलाईत वाजतगाजत प्रदक्षिणा गंजगोलाईतील श्री जय जगदंबा मंदिरात सकाळी दहाला पारंपरिक वाद्यांच्या निनादात उत्सवमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर परंपरेप्रमाणे गंजगोलाईला पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. यावेळी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती. मंदिरात उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर संस्थानचे अध्यक्ष शिवशंकर बिडवे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी शिवशंकर पारशेट्टी, सुभाष हत्ते, बसवंत भरडे, राजेश्वर डांगे यांच्यासह अन्य विश्वस्त उपस्थित होते. घटस्थापनेनंतर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. --- मंदिरात दर्शनासाठी लगबग ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष करीत गांधी चौकातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवस्थानचे अध्यक्ष राजकुमार झिपरे यांच्या हस्ते दुपारी बाराला घटस्थापना करण्यात आली. यावेळी मल्लिकार्जुन घुगरे, राजकुमार झिपरे, सिद्धेश्वर टिप्परकर, विष्णू तिवारी, दत्तात्रय झिपरे, प्रकाश साठे, माणिक आपुणे, सुनील तिवारी, सोमनाथ कद्रे, बबन भास्कर, रेखा साठे आदी उपस्थित होते. जुना औसा रस्ता भागात असलेल्या श्री कालिका देवी मंदिरात अतिशय आनंददायी वातावरणात नवरात्रोत्सवाला सुरवात झाली. मंदिराचे अध्यक्ष दीपक दीक्षित यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. गांधी मार्केट भागात असलेल्या जय अंबिका मंदिरातही घटस्थापनेला भाविकांची चांगलीच गर्दी झाली होती. यावेळी प्रवीण ब्रिजवासी, देवस्थानचे अध्यक्ष अमर कोकाटे यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. श्री अंबामाता मंदिरातही पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. झिंगणप्पा गल्लीतील श्री जयभवानी नवरात्र महोत्सव समितीच्या उत्सवात सकाळी सातला घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर दर्शनासाठी ठिकठिकाणच्या मंदिरात भाविकांची एकच लगबग पाहायला मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT