छत्रपती संभाजीनगर

नवरात्र महोत्सवात भीक मागणाऱ्या सात बालकांची सुटका

CD
नवरात्र महोत्सवात भीक मागणाऱ्या सात बालकांची सुटका ----- धाराशिव, ता. १८ : ज्या वयात बालकांच्या हातात पाटी-पुस्तक हवे आणि खेळायला मैदान, त्या कोवळ्या वयात भीक मागण्याची वेळ आलेल्या बालकांसाठी महिला व बालविकास विभाग धावून आला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर येथे लाखो भाविक दाखल होत आहेत. या गर्दीचा गैरफायदा घेऊन बालकांकडून भीक मागून घेण्याचे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाने राबविलेल्या मोहिमेत सात बालकांची सुटका करण्यात आली. शहरात शुक्रवारी (ता. १६) एक विशेष बालभिक्षेकरी प्रतिबंध मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान तुळजापूर परिसरात भीक मागताना आढळलेली पाच मुले आणि दोन मुली अशा एकूण ७ बालकांना सुखरूप ताब्यात घेण्यात आले. या सर्व बालकांना तत्काळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. त्यानंतर समितीच्या निर्देशानुसार या सर्व बालकांना सुरक्षित वातावरणासाठी निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे. या मोहिमेत जिल्हा महिला व बालसंरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन, सखी वन स्टॉप सेंटर, युवा ग्राम विकास मंडळ संस्था, पोलिस विभाग, विशेष बाल पोलिस पथक व सामाजिक कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

रस्त्याचं काम सुरु असतानाच भरधाव कारची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू; अनेक जण गंभीर

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Tukaram Munde Viral Video : तुकाराम मुंढेंचा VIDEO व्हायरल; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंध काय?

मुंबईत नोकरी मिळाली, जॉइनिंग करण्याआधीच आक्रीत घडलं, २३ वर्षीय तरुणीला नराधमाने संपवलं, पुलावरून ओढत नेत...; कुडाळमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT