छत्रपती संभाजीनगर

३० टक्क्यांपर्यंत भाववाढ तरी नवरात्रीत ‘ड्रेस-साड्यांच्या खरेदीची धूम

CD
ABD26J80817 -- छत्रपती संभाजीनगर : नवरात्रीनिमित्त साड्यांच्या खरेदीसाठी आलेल्या महिलांना साड्या दाखवताना सेल्समन. ----- नवरात्रीच्या फॅशनला मिरर वर्कची झळाळी चनिया-चोली, लेहेंगा, अजरख प्रिंटसह फ्युजन पोशाखांना तरुणींची पसंती ----- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. ६ : नवरात्रीचे नऊ रंग, गरब्याचा उत्साह आणि त्याला साजेशी पारंपरिक फॅशन... नवरात्रीच्या दिवसांना सुरवात होण्यापूर्वीच शहरातील कपड्यांच्या बाजारपेठेत दांडियासाठी ड्रेसची खरेदी सुरू झाली आहे. विशेषतः तरुणींमध्ये चनिया-चोली, लेहेंगा, मिरर वर्क, अजरख प्रिंट आणि मल्टी कलर पोशाखांसह घुंगरू, गडवाल, रजवाडी, गुजराथी वर्कच्या नवरंगी साड्यांची मागणी वाढली आहे. नवरात्रीनिमित्त कपड्यांच्या बाजारपेठेत खरेदीची उलाढाल वाढण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. यंदा केवळ भडक आणि जड पोशाखापेक्षा हलका, आरामदायी आणि गरबा खेळताना सहज हालचाल करता येणारा पोशाख निवडण्याकडे कल आहे. पारंपरिक भरतकामासोबत आधुनिक ब्लाउज, क्रॉप टॉप, जॅकेट आणि स्कर्टचा मेळ घातला जात आहे. त्यामुळे नवरात्रीची फॅशन आता केवळ पारंपरिक पोशाखापुरती मर्यादित राहिलेली नाही. दांडीया खेळताना जड पोशाखामुळे अडचण येऊ नये, यासाठी हलक्या कापडातील लेहेंगा आणि स्कर्ट-क्रॉप टॉप सेटची मागणी वाढली आहे. पारंपरिक स्कर्टसोबत आधुनिक ब्लाऊज किंवा क्रॉप टॉप, तसेच चनिया-चोलीवर डेनिम जॅकेट असा फ्युजन लूकही यंदाच्या फॅशनमध्ये दिसत आहे. ----- मिरर वर्कची चमक कायम गरबा पोशाख म्हटले, की मिरर वर्कला विशेष महत्त्व आहे. यंदाही रंगीत आरसे, गोटापट्टी, धाग्याचे भरतकाम आणि पारंपरिक नक्षीकाम असलेल्या चनिया-चोलीला मागणी आहे. काळा, पांढरा, मरून, लाल, पिवळा आणि विविध रंगांचा संगम असलेले पोशाख विशेष आकर्षण ठरत आहेत. मिरर वर्कसोबत ऑक्सिडाइज्ड दागिने वापरण्याचा ट्रेंडही कायम आहे. अजरख ब्लॉक प्रिंट, मिरर वर्क आणि गोटापट्टी यांचा वापर करून तयार केलेले पोशाख आकर्षणाचे केंद्र आहेत. रंगीत धागे, आरसे, मोती आणि हाताने केलेले भरतकाम असलेल्या पारंपरिक चनिया-चोलीलाही मागणी आहे. ----- पुरुषांसाठी केडियू, कुर्त्यांचे पर्याय दांडियासाठी तरुणाईकरिता रंगीत केडियू, कुर्ता-पायजमा आणि पारंपरिक जॅकेटला पसंती आहे. महिलांच्या चनिया-चोलीशी रंगसंगती साधणारे पुरुषांचे पोशाख तयार केले जात आहेत. त्यामुळे कपल आणि ग्रुप थीम ड्रेसची मागणी आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालण्याची परंपरा असल्याने एकाच पोशाखावर खर्च करण्याऐवजी अनेक मध्यम किमतीचे पोशाख घेण्याचा पर्याय ग्राहक निवडत आहेत. पोशाखांच्या किमतीनुसार कापड, काम, आरशांचा वापर, भरतकाम बदलते. असे विक्रेत्यांनी सांगितले. ----- (कोट : ABD26J80818) यावर्षी १० ते ३० टक्के दरवाढ आहे. मात्र, फॅशनमध्ये भाववाढ असली तरी विक्रीवर त्याचा परिणाम दिसत नाही. सुरत, वाराणसी, बंगळुरू, जयपूर, कलकत्ता, मदुराई येथील साड्यांची खास मागणी नवरात्रीत असते. खासकरून सध्या घुंगरू, रजवाडी, गुजराथी वर्कच्या साड्यांची मागणी आहे. ग्रुप साड्यांसाठी एकाच रंगाच्या अधिक संख्येने साड्यांच्या मागणीचा ट्रेंड आहे. तसेच ड्रेसेसमध्ये वेस्टर्न पेक्षा पारंपरिक पोषाखाला यावर्षी ग्राहकांतून पसंती मिळतेय. -गिरीश तोलवाणी, संचालक, तोलवाणी टेक्स्टाइल मार्केट ----- अशा आहेत किमती साडी-ड्रेस ..... किंमत गरबा ड्रेस : ४७५ -५००० रुपये अनारकली ड्रेस : ७०० -१५०० रुपये साधी चनिया-चोली : ८०० ते १,५०० रुपये मिरर वर्क चनिया-चोली : १,५०० ते ४,००० रुपये अजरख-पारंपरिक भरतकाम : २,००० ते ७,००० रुपये मुलींचे दांडीया ड्रेस : ६०० ते १,५०० रुपये पुरुषांचा केडियू-कुर्ता : ८०० ते २,५०० रुपये घुंगरू साडी : ७०० ते ९०० गुजराथी वर्क साडी : १२०० ते २००० रुपये गडवाल साडी : ४०० ते ४७५ रजवाडी साडी : १२०० ते २५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधी, प्रियंका गांधींना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT