छत्रपती संभाजीनगर

नवरात्रात उपवासाच्या भाज्यांना पसंती

CD
नवरात्रोत्सवामुळे उपवासाच्या भाज्यांना मागणी ----- बाजारात रेलचेल; भेंडी, रताळी, कच्ची केळी, सिंगाड्याची खरेदी जास्त ------------------------------------- छत्रपती संभाजीनगर, ता. ११ : नवरात्रोत्सवामुळे उपवासाच्या फराळासाठी लागणाऱ्या भाज्यांची मागणी वाढली आहे. भेंडी, डांगर (लाल भोपळा), चक्री, रताळी, कच्ची केळी, भुईमूग शेंगा आणि सिंगाडा यांची खरेदी वाढली असून भावही आवाक्यात आहेत. शहरातील औरंगपुरा, शहागंज, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी यासह विविध ठिकाणी थाटली जाणारी किरकोळ बाजारपेठ नवरात्रीनिमित्त विविध भाज्यांनी सजली आहे. किरकोळ बाजारात उपवासासाठी वापरली जाणारी भेंडी ८० रुपये, रताळी ८० रुपये किलो तर कच्ची केळी ६० रुपये डझनाने उपलब्ध आहेत. दुसरीकडे लिंबाचे भाव १५० ते २४० रुपये किलो, अद्रक १५० ते २४० रुपये आणि लसणाचे भाव २५० ते ४०० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. नवरात्रात उपवास करणाऱ्यांकडून भेंडी, रताळी आणि कच्च्या केळ्यांना विशेष मागणी आहे. भुईमूग शेंगा ५० ते ६० रुपये किलो आणि चक्री ८० रुपये किलोने मिळत आहे. उपवासासाठी वापरल्या जाणाऱ्या सिंगाड्याचे भावही किलोमागे २०० रुपयांच्या आसपास आहेत. नवरात्रात या भाज्यांना मागणी वाढली असली, तरी बाजारात आवक चांगली असूनही मागणीच्या तुलनेत ती काहीशी कमी असल्याचे औरंगपुरा येथील भाजीविक्रेते संजय वाघमारे यांनी सांगितले. ---- टोमॅटो, वांगी, गाजरची आवक कमी दैनंदिन वापरातील काही भाज्यांचे भाव वाढले आहेत. टोमॅटो ३० ते ४० रुपयांवरून ५० रुपये किलो, वांगी ४० वरून ६० रुपये, गाजर ६० वरून ८० रुपये, कारले ६० वरून ८० रुपये, हिरवी मिरची आणि सिमला मिरची ६० वरून ८० रुपये किलो झाली आहे. श्रावण घेवडा ८० रुपये, वाल ८०, गिलके ८०, दोडके ८० आणि शेवगा १०० रुपये किलोने विकला जात आहे. कंटुले २०० ते २४० रुपये किलोपर्यंत आहेत. ---- पालेभाज्यांची आवक सध्या मुबलक भाजीपाल्याच्या वाढत्या भावामध्ये पालेभाज्यांचे भाव तुलनेने कमी आहेत. मेथीची जुडी २० रुपये, कोथिंबीर, चुका, शेपू आणि पालक प्रत्येकी १५ रुपयांना जुडी मिळत आहे. बटाटे २५ ते ३० रुपये, कांदा ६० ते ७० रुपये आणि भोपळा ४० रुपये किलोने विकला जात आहे. मात्र, उपवासासाठी लागणाऱ्या भाज्यांच्या मागणीत वाढ झाल्याने नवरात्रोत्सवात ग्राहकांच्या खिशावरील भार वाढला आहे. ---- भाजीपाल्याचे आजचे भाव (प्रतिकिलो, रु.) बटाटे - २५ ते ३० कांदा - ६० ते ७० भोपळा - ४० काकडी - ५० ते ६० टोमॅटो - ५० वांगी - ६० भेंडी - ८० गाजर - ८० कारले - ८० कोबी - ६० वाल - ८० गिलके - ८० हिरवी मिरची - ८० सिमला मिरची - ८० दिलपसंद - ८० लिंबू - १५० ते २४० दोडके - ८० शेवगा - १०० अद्रक - १५० ते २४० लसूण - २५० ते ४०० श्रावण घेवडा (बिन्स) - ८० कंटुले - २०० ते २४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT