छत्रपती संभाजीनगर

मिटमिट्यात नवरात्रनिमितात धार्मिक कार्यक्रम

CD
मिटमिट्यात नवरात्रीनिमितात धार्मिक कार्यक्रम मिटमिटा : येथील श्री सप्तशृंगी माता, श्री मच्छिंद्रनाथ मंदिरात ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवसांत देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे पूजन, नमन, स्तवन, आराधना व उपासना करण्यात येणार असून, पहाटे देवीचा अलंकारिक शृंगार केला जाईल. ११ ऑक्टोबरला विधिवत पूजा व घटस्थापनेसह भगवान बालाजीला अभिषेक करण्यात येईल. महोत्सवादरम्यान दुपारी १२ ते २ पर्यंत श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ होईल. १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान दुपारी तीन ते सायंकाळी ७ पर्यंत संगीत देवी भागवत सप्ताह आयोजित केला आहे. १२ ला मंदिर परिसरात भागवत ग्रंथाची भव्य पालखी काढण्यात येईल. भागवतकार वसुंधरा पाठक या संगीत देवी भागवत सादर करणार आहेत. १५ ला ललिता पंचमीनिमित्त कुंकूमार्चन होणार असून, १९ ला महाष्टमीच्या दिवशी नवचंडी यज्ञ व होमचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती होईल. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री प्रतिष्ठान ट्रस्ट, स्वामी मच्छिंद्रनाथ मंदिर, मिटमिटाचे व्यवस्थापकीय विश्वस्त वेदांत रत्नपारखी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Sangli Mother Child Death : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

SCROLL FOR NEXT