नवरात्रोत्सवासाठी
घराघरांत सुरू आहे लगबग
कळंब, ता. ८ (बातमीदार) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात दसरा काढण्याची लगबग सुरू झाली आहे. घराची स्वच्छता, धुणी-भांडी, जुन्या वस्तूंची विल्हेवाट आणि सणासाठी घर सजविण्याच्या तयारीला वेग आला असून, महिलांची दिवसभर स्वच्छतेच्या कामात धावपळ सुरू आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने नदी-नाले, ओढे आणि जलस्रोत कोरडे पडले असले, तरी नगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवल्याने नागरिकांना, विशेषतः महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
घटस्थापनेपूर्वी घरातील साफसफाई कपडे, चादरी, पांघरुणे स्वच्छ करण्याची परंपरा आजही शहरासह ग्रामीण भागात जपली जाते. पूर्वी महिला नदी, ओढे, तलावाच्या काठावर धुणी धुतली जात असे. मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे जलस्रोत कोरडे पडल्याने या परंपरेलाही पाण्याअभावी मर्यादा आल्या आहेत.
नवरात्रोत्सवाच्या काळात घराघरांत धार्मिक वातावरण निर्माण होते. त्यामुळे घटस्थापनेपूर्वी घरातील धूळ, कोळ्यांची जाळी, फरशी, भिंती, स्वयंपाकघर तसेच देवघराची स्वच्छता करण्यात आली. घरात पडून असलेले जुने कपडे, न वापरातील साहित्य, भंगार व अनावश्यक वस्तू घराबाहेर काढण्यात आल्या.
बाजारपेठेतही नवरात्रोत्सवाच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केल्याने स्वच्छतेची कामे वेळेत पूर्ण करण्यास नागरिकांना मदत झाली. दोन दिवस शिल्लक असल्याने या कामांची लगबग वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.