फोटो, (ABD26J80786),(ABD26J80787) ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी.
-------------------------------
गरब्याच्या लूकला पारंपरिक ज्वेलरीचा साज
-
प्रशिक्षणाची लगबग ः नेकलेस, कमरबंद, माथापट्टीसह झुमक्यांना पसंती
-
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर ः नवरात्रोत्सव म्हटले, की गरबा आणि त्यासोबतचा खास लूक आलाच. यंदा चनिया चोलीसोबत ज्वेलरीकडेही महिला आणि तरुणींचे लक्ष असून, ऑक्सिडाइज्ड, ट्रायबल, मिरर वर्क, घुंगरू आणि बोहो स्टाइलच्या ज्वेलरीला पसंती मिळत आहे. तीनशे रुपयांपासून तर तीन हजार रुपयापर्यंत आऊटफिट आणि अगदी पन्नास रुपयांपासून पाचशे रुपयापर्यंत ज्वेलरी सेट बाजारपेठेत उपलब्ध आहेत. माथापट्टी, हातफूल, कमरबंद, मोठे झुमके आणि नेकलेस यामुळे गरबा लूकला पारंपरिक आणि आकर्षक रूप मिळत असल्याने मागणी आहे.
नवरात्रीला सुरवात होण्यापूर्वीच शहरात गरब्याच्या कार्यशाळा आणि बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. यंदा नवीन ज्वेलरी आणि आऊटफिट खरेदी करण्यापेक्षा ती रेंटवर घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. एकाच ड्रेससोबत वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी वापरता येत असल्याने रेंटलचा पर्याय महिलांना सोयीचा वाटत आहे. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांत ज्वेलरी रेंटलचा व्यवसाय करणाऱ्यांकडेही गर्दी वाढली आहे.
--
पार्लरमध्ये अपॉइंटमेंटची लगबग
आऊटफिट आणि ज्वेलरीची निवड झाल्यानंतर आता गरबा लूक पूर्ण करण्यासाठी पार्लरमध्ये लगबग सुरू आहे. नवरात्रीनिमित्त पार्लरकडून विविध ऑफर्स आणि पॅकेज दिले जात असून, मेकअप आणि हेअर स्टाइलसाठी तरुणींकडून आगाऊ अपॉइंटमेंट घेतल्या जात आहेत. ज्वेलरी, कपडे आणि पार्लर या तिन्ही व्यवसायांमध्ये सध्या चांगली उलाढाल होत असून, यामध्ये महिला व्यावसायिकांचे प्रमाणही मोठे आहे.
...
ग्रुपच्या सरावाला वेग
शहरात केवळ गरबा प्रशिक्षण घेण्यापुरतीच तयारी मर्यादित राहिलेली नाही. गरबा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तरुणी, महिला, कपल्स आणि विविध ग्रुप सरावाला लागले आहेत. स्पर्धेत आपला ग्रुप उठून दिसावा, यासाठी नृत्यासोबतच कपडे, ज्वेलरी आणि एकसारखा लूक याचीही तयारी केली जात आहे. काही इव्हेंट आयोजकांकडून मोफत सहभागाची संधी दिली जात आहे, तर काही ठिकाणी शुल्क घेऊन मेकअप, हेअर स्टाइल, ज्वेलरी, आऊटफिट आणि गरबा प्रशिक्षण अशा सुविधा एकाच पॅकेजमध्ये दिल्या जात आहेत.
...
चनिया चोलीसोबत मॅचिंग ज्वेलरी
चनिया चोली आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी सेटची माहिती तरुणी व महिलांपर्यंत पोचवण्यासाठी व्यावसायिकांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. वेगवेगळे व्हिडिओ, फोटो आणि पोस्टच्या माध्यमातून नवीन डिझाइन आणि गरबा लूक दाखवले जात आहेत. काही व्यावसायिकांकडून चनिया चोलीसोबत मॅचिंग ज्वेलरी, तसेच मेकअप व इतर सुविधा असलेली पॅकेजेसही दिली जात आहेत. विविध ऑफर्समुळे अशा पॅकेजेसना चांगली मागणी असून, नवरात्रीपूर्वीच बुकिंगला सुरवात झाली आहे.
..
कोट
-
गेल्या आठ दिवसांपासूनच गरबा ज्वेलरीसाठी महिला आणि तरुणी विचारणा करू लागल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, मोठे झुमके, माथापट्टी, हातफूल आणि कमरबंद यांना अधिक मागणी आहे. ही ज्वेलरी खरेदी करण्यापेक्षा तरुणी रेंटवर घेण्यावर भर देत आहेत. ड्रेसनुसार मॅच होणारे ज्वेलरीचे सेटही माझ्याकडे तयार आहेत.
- जयश्री फंड, अलोकनगर, महिला व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.