छत्रपती संभाजीनगर

रिधोऱ्यात रेणुकामातेचा भक्तीचा जागर..! ‘प्रति माहूरगड’ मंदिर नवरात्रोत्सवासाठी सज्ज;

CD
PHU26B14713 रिधोरा देवीची मूर्ती. चार तालुक्यांच्या सीमेवरील मंदिरात रीघ - ‘प्रति माहूरगड’ मानल्या जाणाऱ्या रिधोरा येथे नवरात्रोत्सव फुलंब्री, ता. ११ (बातमीदार) : फुलंब्री-राजूर रस्त्यावरील निसर्गरम्य परिसरात वसलेल्या आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रिधोरा येथील प्रसिद्ध श्री रेणुकामाता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. ‘प्रति माहूरगड’ म्हणून ख्याती असलेल्या या देवस्थानात नऊ दिवस हरिनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांसह मराठवाड्यातून हजारो भाविक हजेरी लावणार असल्याने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. रिधोरा हे गाव छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांच्या सीमेवर असून भोकरदन, फुलंब्री, बदनापूर आणि सिल्लोड या चार तालुक्यांच्या सीमेलगत वसलेले आहे. पूर्वी भोकरदन तालुक्यात असलेल्या या गावाचा सात ते आठ वर्षांपूर्वी फुलंब्री तालुक्यात समावेश करण्यात आला. नवसाला पावणारी देवी अशी श्रद्धा असल्याने येथे वर्षभर भाविकांचा राबता असतो. या मंदिराच्या कळसाचे काम स्वातंत्र्यकाळानंतर (१९४७ नंतर) तर संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार १९९२ मध्ये करण्यात आला. मंदिरासमोर भव्य दीपमाळ आणि भाविकांच्या दातृत्वातून साकारलेले भक्तनिवास दिमाखात उभे आहे. उत्सवादरम्यान दररोज सकाळी व सायंकाळी महाआरती, कीर्तन आणि भजन होणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन ग्रामस्थ व मंदिर समितीने पिण्याचे शुद्ध पाणी, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनरांगा आणि स्वच्छतेचे चोख नियोजन केले आहे. उत्सव यशस्वी करण्यासाठी रेणुकामाता संस्थान कमिटी, शिवछत्रपती राजे नवतरुण मंडळ व ग्रामस्थ परिश्रम घेत असून, भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT