Neet Result 2024  sakal
छत्रपती संभाजीनगर

Neet Result 2024 Controversy : ‘नीट’मधील गैरकारभाराविरोधात याचिका;खंडपीठात १८ जून रोजी होणार सुनावणी

वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतील (नीट) गैरप्रकाराची चौकशी करावी, जेथे प्रश्नपत्रिका केंद्रातून बाहेर पसरली तेथे पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका येथील खंडपीठात सोमवारी (ता. दहा) सादर करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतील (नीट) गैरप्रकाराची चौकशी करावी, जेथे प्रश्नपत्रिका केंद्रातून बाहेर पसरली तेथे पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका येथील खंडपीठात सोमवारी (ता. दहा) सादर करण्यात आली. या याचिकेवर येत्या १८ जून रोजी खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश ब्रह्मे यांच्यापुढे सुनावणी होणार आहे.

निकिता विजय फंदाडे व इतर तिघांनी अॅड. रामराव बिरादार यांच्यामार्फत याचिका केली आहे. ‘नीट’ची (राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा) देशभरातील ५७१ शहरांमध्ये ४ हजार ७५० केंद्रांवर २४ लाख विद्यार्थ्यांनी दिली. परदेशात १४ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. याचिकेनुसार, देशात ‘नीट’च्या परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे ७२० गुण मिळाले. त्यातही आठ विद्यार्थी एकाच हरियाना राज्यातील केंद्रावरील आहेत. गेल्यावर्षी केवळ एकाच विद्यार्थ्याला ७२० गुण मिळाले होते. याशिवाय यंदा तब्बल १,५६३ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण प्रदान करण्यात आले.

या प्रक्रियेत क्लॅट (कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट) पद्धतीचा वापर केला जो की चुकीचा आहे. गुणवत्ता यादीतील ६८ आणि ६९ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ७१८ व ७१९ गुण मिळालेले आहेत. एनटीएच्या (राष्ट्रीय परीक्षा एजन्सी) नियमानुसार ७१८ व ७१९ गुण मिळणे अशक्य आहे. कारण यात ऋण (निगेटिव्ह गुण) पद्धती आहे. जर एका प्रश्नाचे उत्तर चुकले तर पाच गुण कपात होतात. म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच गुण कमी होणे अपेक्षित असताना त्यांचा अनुक्रमे दोन आणि एक गुण कसा कमी झाला?

तसेच, ज्या केंद्रावर व्यवस्थेच्या कारणास्तव परीक्षा उशिरा सुरू झाल्या, अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मिनिटागणिक अतिरिक्त गुण देण्यात आले. यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवलेच नाहीत, त्याचेही त्यांना भरभरून गुण मिळाले आहेत.

हा प्रकार अन्य विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. या परीक्षेतील गुण पद्धत ‘नीट’च्या प्रचलित धोरणाविरुद्ध असल्याचे याचिकेत म्हटले आहे. प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी बिहार, राजस्थान व गुजरात येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असतानाच निकाल जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे निकालाची नियोजित तारीख १४ जून असताना, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच निकाल जाहीर करण्यात आला असून, हे सर्व संशयास्पद असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

SCROLL FOR NEXT