छत्रपती संभाजीनगर

दुष्काळात शेतकऱ्यांना ३३०५ रुपयांचा दिलासा; हावरगावच्या कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर, मात्र डीडीएन शुगरचा दुसरा हप्ता अद्याप प्रतीक्षेत!

CD
नव्या कारखान्याचा ३३०५ रुपयांचा पहिला हप्ता --- दुष्काळात ऊस उत्पादकांना दिलासा; थकीत रकमेबाबत लक्ष घालण्याची मागणी --- कळंब, ता. १४ (बातमीदार) : भीषण दुष्काळ, पाणीटंचाई आणि वाढता उत्पादन खर्च अशा संकटांनी घेरलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हावरगाव येथील तुळजाई शुगर इंडस्ट्रीजच्या नव्या व्यवस्थापनाने दिलासा दिला आहे. कारखान्याची मालकी बाबूराव बोत्रे यांनी घेतल्यानंतर पहिल्याच गळीत हंगामासाठी प्रतिटन तीन हजार ३०५ रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. मात्र, एका बाजूला नवीन व्यवस्थापनाकडून चांगला दर जाहीर होत असताना दुसरीकडे मागील हंगामातील डीडीएन शुगरचा दुसरा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कायम आहे. हावरगाव येथील तुळजाई शुगर इंडस्ट्रीज लि. युनिट क्रमांक १८ च्या पहिल्या गळीत हंगामाचा प्रारंभ नुकताच झाला. मागील हंगामात हा कारखाना डीडीएन शुगर, मुरूड यांनी चालविला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना प्रतिटन दोन हजार ७०० रुपये दर देण्यात आला होता. आता नव्या व्यवस्थापनाने पहिल्याच हंगामात तीन हजार ३०५ रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. तसेच अंतिम ऊस दर इतर कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक देण्याची घोषणा बाबूराव बोत्रे यांनी केली आहे. दरम्यान, तालुक्यातील गूळ पावडरसह साखर कारखान्याने प्रतिटन तीन हजार १५० रुपये दर जाहीर केला आहे. मात्र, दुष्काळात पाणी विकत घेऊन ऊस जगविणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाढत्या खर्चाच्या तुलनेत हा दर पुरेसा आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे अंतिम ऊस दराकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, मागील हंगामातील ‘डीडीएन शुगर’कडून मिळणाऱ्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे. पहिला हप्ता दोन हजार ७०० रुपये मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम अद्याप मिळाली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. नव्या व्यवस्थापनाने दिलासा दिला असलास तरी जुन्या थकबाकीचा प्रश्नही तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे. भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांना त्यांची हक्काची रक्कम मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ऊस उत्पादकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gavit Sisters Case : भारतात पहिल्यांदा महिलांना मिळणार होती फाशी; कोल्हापूरच्या गावित बहिणींचं क्रौर्य ऐकून थरकाप उडेल!

Laxman Hake: लक्ष्मण हाके अंतरवाली सराटीत; दुष्काळ प्रश्नावर शेतकऱ्यांसह ओबीसी आंदोलकांशी चर्चा

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? एरिअर्स आणि वाढीव पेन्शन मिळणार की नाही?

Latest Marathi News Live Update: साई संस्थानच्या बसला अचानक लागली आग.. प्रवासी भाविक सुखरूप

Air Pollution: प्रदूषणाचा विळखा जीवघेणा! आरोग्य विम्याच्या क्लेममध्ये 3 वर्षांत 4.3 पट वाढ; पुणे देशात दुसरे

SCROLL FOR NEXT