News About Att Deep Bhav Yuva Foundation
News About Att Deep Bhav Yuva Foundation 
छत्रपती संभाजीनगर

#Youth_Inspiration : वंचित घटकांच्या उत्कर्षाचा विडा

अनिल जमधडे

औरंगाबाद -  'अत्त दीप भव युवा फाउंडेशन' या तरुणांच्या एका फोरमने वंचित घटकांच्या उत्कर्षाचा विडा उचलला. गरिबांच्या मुलांसाठी बालसंस्कार वर्गाच्या यशस्वी कामानंतर आता उपेक्षित महिलांना शिवणकामासह विविध प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक सक्षम करण्याचा ध्यास या फाउंडेशनने घेतला आहे. 

'अत्त दीप भव युवा फाउंडेशन' सात वर्षांपासून समाजातील अति वंचित घटकांसाठी काम करत आहे. या फाउंडेशनची सुरवात वर्ष 2010 मध्ये झाली. यात प्रामुख्याने चारशे ते पाचशे तरुण-तरुणी सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत आहेत. 

बालसंस्कार केंद्र 
औरंगाबाद शहरातील झोपडपट्ट्यांमधील पाच ते पंधरा वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींसाठी बालसंस्कार केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रांमार्फत स्लम भागातील कामगारांच्या मुला-मुलींसाठी शालेय शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. शहरातील तब्बल 24 झोपडपट्ट्यांमध्ये हे बालसंस्कार केंद्र सुरू केले आहेत. 

स्पर्धा परीक्षा केंद्र 
बालसंस्कार वर्गाप्रमाणेच शहरातील युवा-युवतीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे हा उपक्रमही राबविण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना स्पर्धा परीक्षांसाठीचे पुस्तके दिली जात आहेत. त्यासाठी राजगृह बुक बॅंकेची स्थापना करण्यात आलेली आहे. या मार्गदर्शन केंद्रातून पास झालेले मुले त्यांच्याकडे असलेली पुस्तके बुक बॅंकेला देतात. त्यामुळे बुक बॅंकेच्या
पुस्तकांचा साठा सातत्याने वाढत आहे. 

एक वही, एक पेन 
फाउंडेशनतर्फे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त "एक पेन, एक वही' हे अभियान राबवून मिळालेल्या पेन, वही गरीब मुलांना दिल्या जातात. त्याचप्रमाणे महारक्तदान शिबिर व व्यसनाधीन झालेल्या मुलांना व्यसनातून बाहेर काढून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. 

महिला सक्षमीकरणाचा ध्यास 
बालंस्कार केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र, बुक बॅंक या उपक्रमानंतर आता झोपडपट्टी भागांमध्ये वंचित घटकातील महिलांसाठी शिवणकामासह विविध क्‍लास सुरू केले आहेत. महिलांना नेहमी आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी शहरातील 10 झोपडपट्ट्या निवडून कामाला सुरवात करण्यात आली. त्यामध्ये मॉन्टेसरी, फॅशन डिझायनिंग, कुकिंग क्‍लासेस,  ब्युटीपार्लर, मायक्रो क्‍लास याप्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. 

प्रशिक्षक महिलांची टीम 
सविता प्रधान (रमानगर), अरुणा लहाने (गांधीनगर), संध्या सोनकांबळे (इंदिरानगर), पौर्णिमा हिवराळे (म्हाडा कॉलनी, सातारा), अनिता पवार (बापूनगर), पूनम कावते (गौतमनगर), छाया कीर्तिशाही (बनेवाडी), दीपाली जमधडे (क्रांतीनगर), रजनी गायकवाड (उस्मानपुरा), दर्शना दांडगे (राजनगर, मुकुंदवाडी) या महिलांची टीम रोज तीन तासांचे प्रशिक्षण देणार
आहेत. 

हेही वाचा -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT