photo
photo 
छत्रपती संभाजीनगर

CoronaVirus : कोरोनामुळे राज्यातील विजेची मागणी पाच हजार मेगावॅटने घटली

अनिल जमधडे

औरंगाबाद, : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. लॉकडाऊन परिस्थिती असल्यामुळे राज्यभरात उद्योग व्यवसाय बंद आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसात विजेची मागणी जवळपास चार ते पाच हजार मेगावॅटने घटली असल्याची माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे यांनी दिली. 

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील सर्वच उद्योग- व्यापार, व्यवसाय बंद करण्यात आलेले आहेत. प्रत्येक नागरिकाने घरातच राहावे अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 विजेची वाढली मागणी 

नागरिकांनी अधिकाधिक घरात राहावे यासाठी विविध पातळीवरून प्रयत्न केले जात आहे. राज्यभरात व्यापार-उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे विजेची मागणी जवळपास चार ते पाच हजार मेगा वॅटने घटली आहे. राज्यात २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु होता. त्यानंतर लगेचच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तेंव्हापासुन विजेची मागणी घटली आहे. गेल्यावर्षी २२ मार्च रोजी २० हजार मेगावॅट इतकी मागणी होती. यंदा २२ मार्च रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत १५८८० मेगावॅट मागणी होती. दुपारनंतरच्या सत्रात ही मागणी १५६०० मेगावॅट होती. तर सायंकाळी ही मागणी आणखी घटून १३ हजार २०० मेगावॅट इतकी मागणी नोंदविली गेली. आठवडाभरात अशीच परिस्थिती होती. आठवड्यानंतर म्हणजे ३० मार्च रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत १४ हजार १५० मेगावॅट मागणी होती. दुपारनंतर ही मागणी १४ हजार ३६० तर सायंकाळी ही मागणी अवघ्या १२ हजार १०० मेगावॅट वर येऊन थांबली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

यंत्रणा अधिक सतर्क 

सध्या राज्यात लॉक डाऊन असला तरीही महावितरणची संपूर्ण यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. लॉक डाऊन मुळे नागरिक घरामध्ये आहेत. त्यामुळेय विजेचा पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत. आठवडाभरापासून आवकाळी पावसाने हजेरी लावली.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

या काळात तर महावितरणसमोर मोठे आव्हान होते. राज्यातील महावितरणचे ४० हजार अभियंते आणि कर्मचारी तसेच सव्वा पाच हजार खाजगी एजन्सीचे कर्मचारी, अधिकारी अविरत परिश्रम घेत आहेत. या काळात विजेचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी अधिकाधिक प्रयत्न असल्याची माहिती श्री कांबळे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT