औरंगाबाद : शाखा प्रमुखांना विनोद घोसाळकर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित सुनीता आऊलवार, प्रदीप जैस्वाल, आंबादास दानवे, त्र्यंबक तुपे, नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, बाळासाहेब थोरात. सकाळ
छत्रपती संभाजीनगर

'औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला, महापौर शिवसेनेचाच'

मधुकर कांबळे

औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीत (Aurangabad Municipal Corporation Election) आघाडी होवो अथवा न होवो सर्व वॉर्डांमध्ये आपले उमेदवार असतील. शहराचा नवा महापौर शिवसेनेच्या ताकदीवरच बसवण्यासाठी आतापासून नियोजन सुरु करण्याचे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांनी केले. श्री. घोसाळकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.दहा) शिवसेनेच्या (Shiv Sena) शाखा प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे (MLC Ambadas Danve), आमदार प्रदीप जैस्वाल (MLA Pradip Jaiswal), माजी महापौर त्र्यंबक तुपे, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी आदी उपस्थित होते. श्री.घोसाळकर म्हणाले, की औरंगाबाद (Aurangabad) हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे या शहराचा महापौर शिवसेनेचाच असला पाहीजे. शिवसेनेच्या ताकदीवरच महापौर निवडून आला पाहिजे. शाखाप्रमुख हा संघटनेचा महत्वाचा घटक आहे. महापालिकेच्या निवडणूकीत आघाडी होईल किंवा होणार ही नाही, मात्र आपली पुर्ण तयारी असली पाहीजे.

सर्वच ११५ वॉर्डांमध्ये शिवसेनेचे उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने आतापासून नियोजन करा असे आदेश घोसाळकर यांनी दिले. शाखा प्रमुखांकडून घोसाळकर यांनी प्रातिनिधिक स्वरुपात वॉर्डांमधील कामांचा आढावा घेतला. शहरप्रमुखांनी देखील मनोगत व्यक्त केले. पूर्वचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघातील वॉर्डांमध्ये विकास कामे झाली नसल्याचे सांगितले. या मतदारसंघात आमदार शिवसेनेचा नाही, खासदार शिवसेनेचा नाही त्यामुळे विकास कामांना निधीच मिळत नाही. शिवसेनेचे मंत्री व आमदारांनी निधी द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. औरंगाबाद मध्य व पश्चिम मतदारसंघातील कामांबद्दल मात्र शहरप्रमुखांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अजित दादांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्राथमिक अहवाल उघड

Threat Case: व्यावसायिकांवर धमकीचे सावट! अनोळखी क्रमांकावरून कॉल करत कोट्यवधी रुपयांची मागणी; आठवडाभरातील दुसरी घटना

Video : "अर्जुन आणि सायली, तुमचा साबण खूप slow आहे"; टीआरपी घसरल्यावर पुन्हा एकदा प्रियाची डीएनए टेस्ट !

SCROLL FOR NEXT