2Sakal_20News_11 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत रात्री नऊनंतर दुकाने बंद न केल्यास परवाने रद्द करुन गुन्हा दाखल होणार

शेखलाल शेख

औरंगाबाद : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी १ सप्टेंबर रोजी रात्री नऊनंतर दुकाने सुरु ठेवता येणार नाही असे आदेश दिले. मात्र अनेक दुकानदारांनी आता खो दिल्याने आता दुकानदारांना कोणतीही संधी दिली जाणार नसून रात्री नऊ नंतर दुकाने सुरु राहिल्यास दुकान सिल करुन परवाना रद्द केला जाणार आहे. ऐकले नाही तर प्रसंगी दुकान चालकावर गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी (ता.२२) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, बरेच जण काम नसतांना सुद्धा घराबाहेर पडतात. रात्रीच्या वेळी दुकाने उशीरापर्यंत सुरु राहत असल्याने १ सप्टेंबर रोजी आदेश काढून दुकाने रात्री नऊनंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आता कुणाला ही संधी दिली जाणार नाही. रात्री नऊनंतर दुकान सुरु राहिल्यास दुकान सील करुन परवानगी रद्द केली जाणार आहे. दुकानदारांनी ऐकले नाही तर त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल केले जाणार आहे. सोमवार (ता.२१) सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत सुद्धा लोकप्रतीनिंधीनी दुकाने रात्री उशीरापर्यंत सुरु राहत असल्याचा मुद्द उपस्थित केला होता.

कारवाईसाठी पथक
कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ म्हणाले की, कारवाईसाठी दोन राजपत्रित अधिकारी यांची टिम तयार करण्यात आली आहे. बाजरपेठेच्या ठिकाणी यांची गाडी फिरणार आहे. तसेच व्हीडीओ शुटींग केली जाणार आहे. ज्यांचे अर्धे शटर सुरु राहिल अशा दुकानांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. रात्री साडेआठ वाजेपासूनच दुकानदारांनी दुकाने बंद करण्याची प्रक्रीया सुरु करावी.

बाप मारतो म्हणून मुलीने गाठला रेल्वे रुळ, पुढे देवासारखे धावले पाटील काका ! 

रुजू न होणाऱ्या खासगी डॉक्टरांना बोलणार
खासगी डॉक्टरांच्या सेवा कोविडसाठी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या मात्र यातील बहुतांश डॉक्टर रुजू झाले नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी बैठक घेणार आहे. त्यांच्या समस्या सोडविल्या जातील. मात्र रुजू न झाल्यास कारवाई केली जाणार आहे.

तीन लाखांपेक्षा जास्त लोकांचे सर्वेक्षण
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत २ लाख ३९४ पथके तयार करण्यात आली असून आतापर्यंत ३ लाख १२ हजार लोकांचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT