छत्रपती संभाजीनगर

बसच्या मंद हेडलाईटमुळे रात्रीचा प्रवास धोकादायक

CD
बसच्या मंद हेडलाईटमुळे रात्रीचा प्रवास धोकादायक ---------- जळकोट, ता. १४ (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक बसगाड्यांचे हेडलाईट मंद प्रकाश देत असल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक बनला आहे. रस्त्यावरील खड्डे, वळणे, समोरून येणारी वाहने आणि कडेचे अडथळे स्पष्ट दिसत नसल्याने चालकांना बस चालविताना मोठी अडचण येत असून अपघाताचा धोका वाढला आहे. मुखेड आगाराची सोलापूर- मुखेड बस (एमएच १४ बीटी २५२७) ५ नोव्हेंबर रोजी रात्री मुखेडकडे जात होती. यावेळी बसच्या हेडलाईटचा प्रकाश अत्यंत मंद असल्याचे निदर्शनास आले. ग्रामीण भागातील अंधाऱ्या रस्त्यांवर अशा सदोष प्रकाशयंत्रणेमुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या तालुका शाखा जळकोटच्या वतीने नांदेड विभाग नियंत्रकांकडे निवेदन देण्यात आले. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच खबरदारी घेणे गरजेचे असून, सर्व एसटी बसगाड्यांच्या हेडलाईटची तातडीने तपासणी करावी, मंद प्रकाश असलेले हेडलाईट बदलावेत आणि प्रत्येक रात्रीच्या फेरीपूर्वी प्रकाशयंत्रणेची खात्री करूनच गाड्या सेवेत पाठवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी प्रशासनाने यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: लक्ष्मण हाके अंतरवाली सराटीत; दुष्काळ प्रश्नावर शेतकऱ्यांसह ओबीसी आंदोलकांशी चर्चा

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? एरिअर्स आणि वाढीव पेन्शन मिळणार की नाही?

Air Pollution: प्रदूषणाचा विळखा जीवघेणा! आरोग्य विम्याच्या क्लेममध्ये 3 वर्षांत 4.3 पट वाढ; पुणे देशात दुसरे

Latest Marathi News Live Update: साई संस्थानच्या बसला अचानक लागली आग.. प्रवासी भाविक सुखरूप

नगरपरिषदेच्या गच्चीवरील मटन पार्टी भोवली; अमरावती जिल्हाधिकाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांना नोटीस, दोन दिवसांत मागितला खुलासा

SCROLL FOR NEXT