छत्रपती संभाजीनगर

निलंगा पाणी कपात

CD
निलंग्यात आता दहा टक्के पाणी कपात ------------ नगर परिषदेकडून पाण्याचा वापर काटकसरीने करण्याबाबत आवाहन निलंगा, ता.१५ : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निलंगा शहराच्या पाणी पुरवठ्यात नगर परिषदेने दहा टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. अल निनोमुळे यावर्षी पर्जन्यमान अतिशय कमी झाले आहे. त्यातच अल निनोचा प्रभाव पुढील वर्षापर्यंत राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे. अशा स्थितीमध्ये उपलब्ध जलसाठ्यामध्ये काटकसरीने व अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने पाणी वापरामध्ये १६ ऑक्टोबरपासून किमान १० टक्के कपात करावी, तसेच उपलब्ध पाण्याचा ता.३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवठा व्हावा, या अनुषंगाने आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असे आदेशित केले आहे. त्यानुसार नगर परिषदेकडून शुक्रवारपासून (ता.१६) निलंगा शहरात १० टक्के पाणी कपात करण्यात येत आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे व पाण्याची बचत करावी. पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी आग्रह करू नये. पाण्याचा अपव्यय अथवा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमातील लागू तरतुदींनुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही नगर परिषद प्रशासनाने दिला आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

SCROLL FOR NEXT